टीम इंडियाने रचला इतिहास! भारताकडून ऑस्ट्रेलियाला व्हाईटवॉश

सिडनी –  31 जानेवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील अंतिम टी-20 लढतीत भारताने तिसरी मॅचही आपल्या खिशात घातली आहे. टीम इंडियाने टी-20 या मालिकेत 3-0 असा ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली. टीम इंडियाने 7 विकेट्स राखून 200 रन्स करत टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मैदानात धूळ चारली.
सिडनीच्या टी-20त ऑस्ट्रेलियानं भारताला विजयासाठी 198 धावांचं डोंगराएवढं आव्हान दिलं होतं. 198 धावांचे लक्ष्य घेऊन मैदानावर उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी प्रत्युरात धडाकेबाज सुरूवात केली. रोहितनं 38 बॉल्समध्ये 5 चौकार आणि1 षटकारासह 52 रन्सची खेळी केली तर विराटनं 36बॉल्समध्ये 2 चौकार आणि एका षटकारासह 50 रन्स काढले. मग अखेरच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 17 रन्सची गरज असताना युवराज आणि रैनानं 19 रन्स भारताला विजय मिळवून दिला.