मुरुड बीचवर13 विद्यार्थ्यांचा बुडून अंत


 रायगड – 01 फेब्रुवारी : जिल्ह्यातील मुरुड जंजिरा बीचवर आजचा दिवस हा काळा सोमवार ठरलाय. समुद्रकिनार्‍यावर 13 महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झालाय. या दुर्घटनेत 10 विद्यार्थिनी आणि 3 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 5 विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात आलीये. हे सर्व विद्यार्थी पुण्यातील आहे.
पुण्यातल्या अबिदा कॉलेजचे विद्यार्थी सहलीसाठी मुरुडला आले होते. एकूण 126 विद्यार्थी होते. त्यातल्या 13 जणांचा समुद्रात बुडून मृत्यू झालाय. एकदरा समुद्रकिनार्‍यावर हे विद्यार्थी पोहत होते त्यावेळी ही दुर्देवी दुर्घटना घडली. बुडालेल्या सर्व विद्यार्थ्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांचं आणि तिथल्या स्थानिकांचं बचावकार्य सुरू आहे. विशेष म्हणजे, भरतीची वेळ असतानाही हे विद्यार्थी पोहत होते. स्थानिकांनी पोहायला विरोध केला होता, पण विरोध डावलून विद्यार्थी पोहत असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. हे 123 विद्यार्थी बीएस्सी कॉम्प्युटर सायन्स आणि बीसीएचे होते.