पंढरपूर बसस्थानकावरील सुलभ शौचालयाची दुरावस्था.. बघा पंढरपूर लाईव्ह चा स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट
पंढरपूर लाईव्ह (स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट)
दि.4 मे 2015
बघा व्हिडीओ:-
एक शौचालय बंद अवस्थेत तर दुसर्या शौचालयाच्या छताची चाळण....
शौचालयाच्या छतावरील पत्रे सडलेले, कुजलेले...
बघा व्हिडीओ:-
वादळ-वारे आले तर हे पत्रे उडून प्रवाशांना दुखापतही होऊ शकते...
शौचालयात कमालीची दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे साम्राज्य....
बघा व्हिडीओ:-
जे शौचालय सुस्थितीत आहे... तेच नेमके बंद का...?
वारकरी तर सोडाच रेग्युलर बस प्रवासधारकांनाही शौचालयाची समाधानकारक सोय नाही....!
बघा व्हिडीओ:-
कोट्यावधी रुपये खर्च करुन पंढरपूर च्या नव्याने बांधण्यात आलेल्या बसस्थानकावरील सुलभ इन्टरनॅशनल महाराष्ट्र च्या सुलभ शौचालयांची दुरावस्था झालेली असून या ठिकाणी जे सुस्थितीत असलेले एक शौचालय बंद असून तेथील परिसरात सर्वत्र घाणीचे सामा्रज्य पसरलेले आहे. जे शौचालय चालु आहे त्याची अवस्था ‘‘असून अडचण-नसून खोळंबा’’ अशी झालेली आहे. जे शौचालय चालु आहे त्याच्या छतावरील पत्रे कुजलेले असून या पत्र्यांची अक्षरश: चाळण झालेली आहे. सर्वत्र दुर्गंधी पसरलेली असून टॉयलेटच्या फरशा व भांड्यांची अवस्था केविलवाणी आहे.
याठिकाणी समक्ष जाऊन ‘पंढरपूर लाईव्ह’ ने बनविलेला हा खास व्हिडीओ रिपोर्ट बघा... प्रवाशाची प्रतिक्रिया...
बघा व्हिडीओ:-
बघा व्हिडीओ:-
वेळीच येथील सुस्थितीत असलेल्या शौचालयाची स्वच्छता करुन ते प्रवाशांसाठी खुले करण्यात यावे. तसेच दुसर्या शौचालयावरील छताची पत्रे नविन बसवावीत तसेच आतील फरशा, भांडे व आवश्यक तेथे डागडुजी करावी, वेळच्या वेळी सुलभ शौचालयांची स्वच्छता करण्यात यावी. अशी प्रवाशांची मागणी आहे.
- Manohar Garande Bas stand samor opan var lok savchalay kartat
- Bablu Boralkar कुणाला कांहि देणे घेणे नाहि
- Moin Iliyas Shaikh Zhal eliction atta kon laksh denar pandharpur chi vat lavli ;-(
Mådhâv Jådhâv महिला
आणि लहान मुलांना मोफत असे बोर्ड लाऊन हि पैसे घेतले जातात बाहेर २रुप्ये
बोर्ड आणि आत ५ रुपये घेतात अंघोळी साटी १० रुपये घेतले जातात