सलमान हिट अँड रन प्रकरणी महत्त्वाची व्यक्तींची ओळख

पंढरपूर लाईव्ह

मुंबई : हिट अँड रन प्रकरणी सलमान खानच्या भवितव्याचा फैसला आज होणार आहे. मुंबईचं सत्र न्यायालय या प्रकरणाचा निकाल देणार आहे. तब्बल 12 वर्ष सुरु असलेल्या या खटल्यावर निर्णय येणार असल्याने संपूर्ण देशाचं लक्ष या निकालाकडे लागलं आहे.

 

या खटल्यातील महत्त्वाची व्यक्तींची ओळख करुन घेऊया.

 रवींद्र पाटील - सलमान खानचा बॉडीगार्ड
 रवींद्र पाटील 1998 बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल. मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच. 28 सप्टेंबर 2002 रोजी घटना घडली तेव्हा रवींद्र 24 वर्षांचा होता. चुणचुणीत आणि उमद्या व्यक्तिमत्त्वामुळेच त्याची सलमानचा अंगरक्षक म्हणून नियुक्ती झाली. घटनेच्या रात्री तो सलमान सोबत गाडीतच होता.  त्या रात्री सलमानने जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी

 

काढली आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला. तेव्हाच त्याने सलमान शुद्धीत नसल्याची जाणीव करुन दिली होती. त्यावेळी सलमानने मद्यपान केलं होतं आणि तो नशेच्या अंमलाखाली होता हे रवींद्र पाटीलनेच वांद्रे सत्र न्यायालयात सांगितलं आहे.
 घटनेनंतर रवींद्र पाटीलनेच बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती. त्यामुळे सहाजिकच तो या घटनेचा सर्वात महत्त्वाचा साक्षीदार होता. खटल्यादरम्यान साल 2007 मध्ये रवींद्र पाटीलचा प्रदीर्घ आजाराने मृत्यू झाला. मात्र तरीही सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली नव्याने खटला सुरु झाला तेव्हा रवींद्र पाटीलने बांद्रा मैजिस्ट्रेट कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी पक्षाकडून मागणी करण्यात आली ज्याला कोर्टानही मान्यता दिली.

नुरुल्ला मोहम्मद शरीफ - अपघातातील मृत
 28 सप्टेंबर 2002 च्या रात्री झालेल्या अपघातात 4 व्यक्ती जखमी झाल्या तर नुरुल्ला शरीफ यांना आपला जीव गमवावा लागला. नुरुल्ला शरीफ नेहमीप्रमाणे आपल्या साथीदारांसोबत दुकानाबाहेर फुटपाथवर झोपले होते, मात्र अचानक झालेल्या अपघाताने साऱ्यांची झोप उडवली. डोळे उघडले तेव्हा मोहम्मद अब्दुल्ला आणि नुरुल्ला हे दोघेही गाडीखाली सापडले होते. दोघेही जीवाच्या आकांताने ओरडत होते. मात्र भली मोठी गाडी हाताने हलवून त्याखालील लोकांना बाहेर काढणं अशक्य होतं. अब्दुल्लाला या अपघातात आपला एक पाय कायमचा गमवावा लागला.
 नुरुल्लाच्या मृत्युबाबतही सेशन्स कोर्टातील अंतिम सुनावणीच्या वेळी एक खळबळजनक खुलासा करण्यात आला. नुरुल्लाचा मृत्यु हा अपघातात नव्हे तर अपघातानंतर गाडी क्रेनच्या सहाय्याने बाजूला करताना बंपर तुटून गाडी खाली पडली आणि त्यामुळे डोक चिरडल्याने तो मरण पावला असा दावा बचाव पक्षाकडून करण्यात आला. पोस्टमार्टम रिपोर्टचा अहवाल आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या साक्षीनुसार गाडी खाली आल्यानंतर बराच काळ तो मदतीसाठी याचना करत होता हे स्पष्ट झालं आहे.

डी डब्ल्यू देशपांडे - न्यायधीश, सत्र न्यायालय
 मुळचे नागपूरचे असलेले डी डब्ल्यू देशपांडे यांची मुंबईच्या दिवाणी आणि सत्र न्यायालयात 2012 रोजी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. 2014 पासून ते सीबीआईचे विशेष न्यायाधीश म्हणून काम पाहत आहेत. सेशन्स कोर्टात येण्याआधी त्यांनी दादरच्या अतिरिक्त दंडाधिकाऱ्यांची भुमिका बजावली आहे. तर मुंबईत येण्यापूर्वी अलिबागचे जिल्हा न्यायाधीश म्हणूनही त्यांनी काम केलं आहे.

डिसेंबर 2013 पासून सलमान खान हिट अँड रन खटल्याची नव्याने सुनावणी मुंबईच्या सेशन्स कोर्टात सुरु आहे. यावर दोन्ही पक्षांनी सादर केलेले साक्षी पुरावे आणि बाजू ऐकल्यानंतर न्यायाधीश डी डब्ल्यू देशपांडे काय निकाल देतात यावर करोडो लोकांच्या नजरा लागल्या आहेत.

कमाल खान - बॉलिवूड गायक
 कमाल खान बॉलिवुडमधला प्रसिद्ध गायक आणि सलमानचा जवळचा मित्र. त्या रात्री कमालही सलमान खानसोबत गाडीत होता. घटनेनंतर पोलिसांना दिलेल्या साक्षीत त्यानंही सलमान खानच गाडी चालवत होता असं म्हटलं आहे. मात्र नव्याने सुरु करण्यात आलेल्या खटल्यातील साक्षीदारांच्या यादीतून कमाल खानचं नाव वगळण्यात आलं आहे. कारण कमाल खान सध्या परदेशात आहे. तो परत येण्याची शक्यता कमी आहे. सलमान खानने सत्र न्यायालयात दिलेल्या साक्षीत कमाल खान हा गाडीत मागच्या बाजूला रवींद्र पाटीलसोबत बसला होता असा दावा केला आहे. अपघाताच्या रात्रीनंतर कमालची भेट घेतली नसल्याचंही सलमानने म्हटलं आहे.
 वकील आभा सिंह यांनी याचिकाकर्ता संतोष दौंडकर यांची बाजू मांडताना कमाल खानचं नाव साक्षीदारांच्या यादीतून वगळण्यात आल्याचा कडाडून विरोध केला आहे. इतक्या महत्त्वाच्या साक्षीदाराला विचारात न घेणं कसं शक्य आहे असा युक्तिवाद करत कमालची साक्ष पुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. व्यक्तिशः शक्य नसल्यास व्हिडीओ एविडेंस घेण्याविषयीही कोर्टाला विनंती करण्यात आली आहे. यावरही 6 में रोजी निर्णय होणार आहे.

अशोक सिंह - सलमानचा ड्रायव्हर
 1989... सलमान खान आपल्या पदार्पणातील चित्रपट 'मैने प्यार किया' साईनही केला नव्हता, त्याआधी काही महिने अशोक सिंह सलीम खान यांच्याकडे ड्रायव्हर म्हणून रुजू झाला. गेली 25 वर्ष तो खान कटुंबियांच्या सेवेत आहे. त्यामुळे आपल्या मालकाप्रती असलेली त्याची निष्ठा काय असेल याचा अंदाज येतो. गेली 15 वर्ष अशोक सिंह अंधेरीतील वन बीएचके घरात आपल्या कुटूंबियांसोबत राहतो. अपघात झालेल्या दिवशी अशोकची सुट्टी होती मात्र कामावर असलेला ड्रायव्हर अल्ताफची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे मला जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलला बोलावण्यात आलं, अशी साक्ष अशोकने कोर्टात दिली. त्यानंतर रात्री सलमानच्या घराकडे येत असताना हिल रोडजवळ सलमानच्या लँड क्रुझर गाडीचा पुढचा टायर अचानक फुटला, गाडी माझ्या नियंत्रणाबाहेर गेली आणि समोरच्या दुकानावर जाऊन धडकली. घटनेनंतर तात्काळ वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये माझी साक्ष नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी माझं काहीही ऐकून घेतलं नाही. उलट सलमान खानला अटक केली. असा दावा अशोकने केला आहे.
 सलमान खान हिट अँड रन खटल्यात झालेला सर्वात खळबळ जनक खुलासा म्हणजे, त्या रात्री गाडी सलमान खान नव्हे तर त्याचा ड्रायव्हर अशोक सिंग चालवत होता. स्वतः अशोक सिंहने सेशन्स कोर्टात दिलेल्या साक्षीत ही कबुली दिली आहे. मात्र या साक्षीवर सरकारी पक्षाकडून जोरदार आक्षेप घेतला गेला. 13 वर्ष मूग गिळून गप्प बसलेला सलमान खानचा ड्रायव्हर आता निकाल जवळ येताच अचानक कसा काय जागा झाला? हा सरकारी पक्षाचा सवाल आहे.

************


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 6-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 91 हजार 929  हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 9 हजार 078 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399