जोशाबा टाईम्स् चे संपादक श्रीकांत कसबे तानुबाई बिर्जे ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानीत

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर (प्रतिनिधी):-

मराठा सेवा संघ, शिवराज्य पक्ष व संभाजी ब्रिगेड शाखा तावशी यांच्या वतीने देण्यात येणारा तानुबाई बिर्जे ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार  सा.जोशाबा टाईम्स् चे संपादक श्रीकांत कसबे यांना प्रदान करुन नुकतेच सन्मानीत करण्यात आले.



शंभु, बुध्द, बसव, टिपु, अहिल्या यांच्या जयंती निमित्त दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींचा या संघटनेतर्फे विशेष पुरस्कार देवून गौरव करण्यात येतो. शिक्षक मतदार संघाचे आमदार दत्तात्रय सावंत व इतर मान्यवरांच्या हस्ते स्मृती चिन्ह, सनगमानपत्र, शाल, फेटा, हार व पुष्पगुच्छ देवून श्रीकांत कसबे यांना गौरविण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवकनेते भगिरथदादा भालके हे होते.

राजकीय, कला-क्रिडा, शैक्षणिक, पत्रकारिता, सामाजिक व कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल समाधान जगदाळे (शिवभुषण), निलराज डोंबे (मराठा मित्र), माणिकराव माने (शिवराज्य मित्र), तानाजी अनुसे (आदर्श शिक्षक माध्यमीक), मनोहर जगताप (आदर्श शिक्षक प्राथमीक), दिपाली यादव (अंगणवाडी), पांडुरंग राऊळ गुरुजी (समाजसेवक), सौ.निकीता पाटील (आदर्श माता), संतोष आसबे (कृषीभुषण), गौतमी सातपुते, बबन सातपुते, कमल सातपुते (आदर्श लोक कलावंत) यांनाही यावेळी पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले.

यावेळी सरपंच नामदेव अनुसे, विजय-प्रताप युवा मंचाचे जिल्हाध्यक्ष दिपकदादा वाडदेकर, माजी



         

उपसभापती विजयसिंह देशमुख, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष किरणराज घाडगे, उपसरपंच संजय यादव, मुख्याध्यापक यदबा रणदिवे, नगरसेवक नामदेव भुईटे, दत्ता ताड, बंटी वाघ, सोनबा वाघमारे, अनिल ननवरे (सर), सुभाष यादव, बालमभाई मुलाणी, पांडुरंग सुर्यवंशी यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरुवातीस सर्वांचे स्वागत अध्यक्ष पप्पु यादव यांनी केले. तर प्रास्ताविक शिवराज्य पक्षाचे जिल्हा सचिव प्रमोदराजे जगदाळे यांनी केले. सुत्रसंचलन तालुका कार्याध्यक्ष अनिल यादव यांनी केले. आभार अमोल कुंभार यांनी मानले. तर मान्यवरांचा सत्कार धनसिंह यादव व सिध्देश्‍वर यादव यांनी केला.  

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संभाजी ब्रिगेड, शिवराज्य पक्ष, छत्रपती शिवराय मुस्लिम ब्रिगेड, बसव प्रतिष्ठान, प्रमोदराजे जगदाळे मित्र परिवार, ग्रीन स्टार ग्रुप, विश्‍वकर्मा ग्रुप, सन्मान प्रतिष्ठान, शिवा संघटना, अमोलराजे कुंभार मित्रमंडळ, रघुनाथ यादव, दत्ता आसबे यांनी परिश्रम घेतले. 
>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार 750 मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 24-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 3 हजार 742 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  24-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 750 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399