पंढरपूर लाईव्ह:-
येथील लिंक रोड वर असलेले जागृत गणेश मंदिर सिंघण गणपती (नागालॅन्डचा राजा) च्या चरणी बार्शी येथील अॅड. अमित गायकवाड व अॅड.सौ. पद्मजा अमित गायकवाड या गणेशभक्त दांपत्याने नुकताच एक तोळे सोन्याचा करदोडा अर्पण केला. यावेळी श्री.गायकवाड यांचे जेष्ठ बंधु अमोल गायकवाड (अॅग्रीकल्चर ऑफीसर) उपस्थित होते.
अॅड. पद्मजा गायकवाड या सिंघण गणेशाला आपले आराध्ये दैवत मानतात. येथील श्री.गणेशावर त्यांची नि:स्सीम श्रध्दा आहे. त्यांचे पती अॅड. अमित गायकवाड हे नुकतेच न्यायाधिश (जज) च्या परीक्षेत सर्वोच्च गुणांकाने उत्तीर्ण झाले. याबाबत अॅड. सौ. गायकवाड यांनी श्री.सिंघण गणेशाला साकडे घातले होते. श्री च्या कृपार्शिवादाने सर्व मनाप्रमाणे घडत असल्याची त्यांची धारणा आहे. याप्रित्यर्थ आपल्या मनातील इच्छा त्यांनी आज पुर्ण केली.
यावेळी या मंदिराचे संस्थापक मालक गणेशभक्त प्रा. नागेश सिंघण (सर) व अनेक गणेश भक्त उपस्थित होते.
सिंघण गणेश हा नवसाला पावणारा असल्याची अनेक गणेश भक्तांची श्रध्दा आहे. या मंदिरात श्रीविठ्ठल रुक्मिणी, श्री.महालक्ष्मी देवी, विष्णु आदीं देवतांच्या ही सुबक मुर्ती आहेत. पंढरपूर शहर व परिसराबरोबरच महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून अनेक गणेश भक्त या मंदिरातील ‘श्री’ च्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत असतात. येणार्या भाविकांना पिण्याचे स्वच्छ पाणी व विश्रांतीसाठीची सोय केलेली असून लवकरच मंदिरातील इतर विकासकामे करणार असल्याची माहिती श्री.सिंघण सर यांनी पंढरपूर लाईव्हशी बोलताना दिली.
>>>>>>>>>>>>>>>>>>>