पंढरपूर च्या शिवाजी चौकात ट्रॅफिक हवालदाराच्या अंगावर घातली भरधाव वेगात गाडी... जीवे मारण्याचा उद्देशाने केले कृत्य... थांबायला का सांगितले म्हणुन दुचाकीवरील तीघांनी केला गुन्हा... एक जण अटकेत... दोघे फरार... आरोपी मद्यधुंद अवस्थेत... हवालदार जखमी...

पंढरपूर लाईव्ह:-
आज दि.23/5/2015 रोजी सायंकाळी 7:30 वा. चे सुमारास पंढरपूरच्या शिवाजी चौकात ड्युटीवर असलेल्या एका   ट्रॅफिक हवालदाराच्या अंगावर दुचाकी घालुन जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद संबंधित हवालदाराने पंढरपूर पोलिस ठाण्यात  केली आहे.

याबाबत चे पंढरपूर पोलिस ठाणेतून मिळालेले वृत्त असे की, हितेश रामजी वसावे (वय 30) हे    पंढरपूर शहर पोलिस स्टेशन  चे वाहतुक शाखेत गेली दोन वर्षापासुन नेमणुकीस आहेत. आज दि. 23 मे 2015 रोजी सायंकाळी  साडे सहा वाजणेचे सुमारास ते येथील शिवाजी चौकात पंढरपूर शहर वाहतुक शाखेचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक निलेश गोपाळ चावडीकर व अन्य काही ट्रॅफिक हवालदारांसह  आपले वाहतुक अधिनियमनाबाबतचे कर्तव्य बजावत होते. तेंव्हा साधारण 7:30 वाजणेचे सुमारास म.फुले चौकाकडून  मोटार सायकल क्रमांक एम एच 13 बी ए 6885 वरील तिन इसम शिवाजी चौकाकडे भरधाव वेगात आले. यावेळी हवालदार हितेश वसावे यांनी त्यांना थांबण्याचा  इशारा केला परंतु ते न थांबता पुढे जाऊन थांबले. व परत माघारी वळुन हवालदार वसावे यांचे अंगावर ठार मारणेचे उद्देशाने वेगात असलेली मोटार सायकल घातली. त्यामुळे श्री. वसावे  हे खाली पडले व जखमी झाले. मात्र येथे असलेले पोलिस उपनिरीक्षक श्री. चावडीकर सो व इतर पोलिसांनी तात्काळ मोटारसायकल सह त्यास पकडले. मागे बसलेले दोघे गर्दीचा फायदा घेवून पळून गेले. पकडलेल्या आरोपी मोटारसायकल स्वाराचे नाव विजय अशोक माने (वय 26), रा. सावतामाळी मठाजवळ संतपेठ पंढरपूर असे असुन ज्ञानेश्वर राजाभाऊ कोकणे, सुरज अनिल बनकर,  दोघे रा. भाई भाई चौक पंढरपूर  हे  आरोपी फरार  आहेत.

वरील आरोपींवर पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याबाबत सरकारतर्फे कायदेशीर रित्या  भादवि कलम 327, 353 अन्वये गून्हा दाखल झालेला आहे.

शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री  नावंदे सो यांचे मार्गदर्शनाखाली पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक  श्री. निलेश गोपाळ चावडीकर हे करत आहेत.

या घटनेवेळी शिवाजी चौकात मोठी गर्दी जमा झाली होती. मोटारसायकल वरील तिघे मद्यधुंद अवस्थेत असल्याची चर्चा होती.