बॉलिवुडचा प्रसिध्द अभिनेता सलमान खानला पाच वर्ष सश्रम कारावास....

पंढरपूर लाईव्ह

मुंबई : सलमान खानच्या हिट अँड रन केस प्रकरणाचा फैसला आज झाला असून तब्बल 13 वर्ष सुरु असलेल्या या खटल्यावर निर्णय येणार असल्याने सार्‍या देशाचं लक्ष आजच्या निकालाकडे लागलं होतं.  2002 सालच्या हिट अँण्ड रन प्रकरणात दोषी ठरलेला बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मुंबई सत्र न्यायालयाने पाच वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.



 

सलमानला तीन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाल्याने त्याची रवानगी आता थेट तुरुंगात होणार आहे. तीन वर्षापेक्षा कमी शिक्षा झाली असती तर, सलमानला जामिनासाठी अर्ज करता आला असता. सदोष मनुष्यवधाच्या आरोपाखाली सलमानला पाचवर्ष तुरुंगवास सुनावण्यात आला आहे. गाडी चालवताना वाहन परवान नसणे तसेच मद्याच्या अमलाखालीगाडीचालवणे या आरोपांखालीही सलमानला शिक्षा सुनावण्यात आली आहे.मुंबईच्या आर्थरररोड कारागृहात सलमानला पाठवले जाऊ शकते. सलमानला जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज करता येणार आहे. सदोष मनुष्यवधाच्या गुन्हयाखाली सलमानला जास्तीत जास्त दहा वर्षाची शिक्षा होऊ शकत होती. मात्र न्यायालयाने त्याला पाच वर्ष तुरुंगवास सुनावला.
सलमानचे वकिल श्रीकांत शिवदे यांनी सलमानच्या समाजकार्याचा हवाला देऊन त्याला कमीत कमी तीन वर्षांच्या आत शिक्षा सुनावण्याची विनंती केली होती. मात्र न्यायालयाने सलमानला पाच वर्ष तुरुंगावासाची शिक्षा सुनावली.

आणि दबंगला रडू कोसळलं...!


 गेल्या बारावर्षांपासून सुरु असलेल्या खटल्याचा निकाल बुधवारी लागला. सलमानला धीर देण्यासाठी त्याचे कुटुंबिय त्याच्यासोबत न्यायालयात हजर होते. न्यायाधीश डी.डब्ल्यू.देशपांडे यांनी निकाल जाहीर करताच सलमानच्या डोळयात अश्रू तरळले.06 मे : मुंबईत 2002 साली वांद्र्यात दारू पिऊन बेदकारपणे गाडी चालवून एकाच बळी घेणार्‍या सलमान खानला आपल्या कृत्यावर आता रडू कोसळलंय. मुंबई सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवल्यानंतर सलमानला कोर्टातच रडू कोसळलं.
न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी तुझ्याविरुद्धचे सगळे आरोप सिद्ध झाले आहेत. तुझा ड्रायव्हर अशोक सिंग नव्हे, तर तूचं गाडी चालवत होतास. तू दारू पिऊन गाडी चालवत होता. तुला होऊ शकणार्‍या शिक्षेवर काय म्हणणं आहे? असा सवाल केला असता सलमान स्तब्ध झाला आणि रडू लागला.
थोड्यावेळाने स्वत:ला सावरत सलमानने दया याचना करण्यास सुरुवात केली. मी बिंईंग ह्यूमन या सामाजिक संस्थेचा संस्थापक असून आतापर्यंत मी 42 कोटी या संस्थेच्या कामासाठी दिले आहेत. माझं सामाजिक कार्य पाहून शिक्षा कमी द्यावी अशी याचना केली. एवढंच नाहीतर सलमानच्या वकिलांनी शिक्षा कमी करा वाटलं तर कितीही दंड भरण्यास तयार आहोत असा युक्तीवाद केला. सलमानचा हुद्दा पाहुन शिक्षा देऊ नका, त्याचा गुन्हा पाहुन शिक्षा द्या अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

बहुप्रतीक्षित हिट अँड रन प्रकरणी सेशन्स कोर्टाने फैसला सुनावला आहे. अपघात झाला त्यावेळी सलमान मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता आणि त्याच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं असं मान्य करत कोर्टाने सलमानला दोषी ठरवलं आहे..

 शिक्षा ऐकून सलमानला घाम फुटला. तर त्याच्या बहिणींनाही अश्रू अनावर झाले. कोर्टाने दोषी ठरवल्याचा निर्णयाच्या धक्क्यामुळे सलमानच्या आईची प्रकृती बिघडली


2002 साली बेदकारपणे गाडी चालवून एकाचा बळी घेणार्‍या सलमान खानाला मुंबई सत्र न्यायालयाने दोषी ठरवलंय. सलमानविरोधात सर्व आरोप सिद्ध झाले असून सदोष मनुष्यवधाचा गुन्हाही सिद्ध झालाय. सलमानला जास्तीत जास्त 10 वर्षांची शिक्षा होऊ शकते. पण, शिक्षा कमी व्हावी यासाठी सलमानच्या वकिलांचा कोर्टात युक्तीवाद सुरू आहे. शिक्षा कमी करा,जास्तीचा दंड भरण्यास तयार आहोत अशी याचना सलमानने केलीये. तर कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर सलमानला कोर्टात अश्रू अनावर झाले. कोर्टातच सलमान रडला. त्याची बहिण अर्पितालाही कोर्टात रडू कोसळलं. कोर्टाने दोषी ठरवल्याचा निर्णयाच्या धक्क्यामुळे सलमानच्या आईची प्रकृती बिघडली त्यामुळे कोर्टातून सलमानचा भाऊ सोहेल खान घरी परतला. 

 सलमान खान या प्रकरणात दोषी आढळल्यास त्याला 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 28 सप्टेंबर 2002 रोजी सलमानच्या लँड क्रूझर गाडीने ब्रांद्र्यात फुटपाथवर झोपलेल्या 5 जणांना चिरडलं होतं. यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर 4 जण जखमी झाले होते.

 या प्रकरणात 2002 ते 2012 पर्यंत सलमान खानवर बेदरकारप्रमाणे गाडी चालवणे आणि वाहतूक नियम मोडणे या कलमांखाली खटला सुरु होता. मात्र 2012 मध्ये वकील आभा सिंह यांनी केलेल्या अर्जानंतर सलमानवर सदोष मनुष्यवधा गुन्हा दाखल करण्यात आला आणि नव्याने खटला सुरु झाला.
 हिट अँड रन प्रकरणी 3 वर्षात एकूण 28 साक्षीदारांची उलट तपासणी करण्यात आली. तर अशोक सिंह नावाच्या सलमान खानच्या ड्रायव्हरने अचानक न्यायालयात येऊन साक्ष दिली आणि त्या रात्री आपणच गाडी चालवत होतो हे सांगून खळबळ उडवून दिली. त्यामुळे या प्रकरणाला नवा ट्विस्ट मिळाला आहे.
 सरकारी आणि बचावपक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद संपल्यानंतर सत्र न्यायालयाने आज 6 मे ही निकालाची अंतिम तारीख असल्याचं जाहीर केलं.

 काय आहे हिट अँड रन प्रकरण-

 हिट अँड रन प्रकरण हे 13 वर्षे जुनं आहे. 28 सप्टेंबर 2002 च्या रात्री सलमान खानच्या गाडीनं फुटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडल्याचा आरोप आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले होते.

 यापूर्वीच्या सुनावणीत सलमानला प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने सलमानला ओळखलं होतं. तसंच त्यावेळी सलमान खानच ड्रायव्हिंग करत होता, अशीही साक्ष देण्यात आली.
 या प्रकरणी आतापर्यंत आठपेक्षा जास्त साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या आहेत.

************


पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 6-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 91 हजार 929  हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 9 हजार 078 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399