याबाबत
चे पोलिस सुत्रांकडून समजलेले सविस्तर वृत्त असे की, काल दि. 5 मे 2015
रोजी पंढरपूर चे तहसिलदार गजानन गुरव यांना एका निनावी फोन आला की, ‘‘येथील
स्मशान भुमी जवळून वाळु चोरी होत आहे. आपण तात्काळ यावे.’’ यानंतर
तहसिलदार श्री.गुरव हे सदर ठिकाणी गेले असताना तेथे अगोदरच उपस्थित असणारे
आरोपी समाधान पांडुरंग अधटराव (33) रा. हरिदास वेस, अमित पोपटराव कोळी (27)
रा. इंदिरा कॉलनी गोपाळपूर, महेश नागनाथ देवकर (27) रा. संतपेठ पंढरपूर
यांचेसह 10 ते 13 जणांनी मिळून श्री.गुरव यांना दमदाटी आणि शिवीगाळ करत
नदीपात्रात जाण्यास मज्जाव केला.
या संदर्भात वरील आरोपींच्या विरोधात स्वत: तहसिलदार गजानन गुरव यांनी दि. 6
मे 2015 रोजी पहाटे 2 वाजता पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा
आणल्याप्रकरणी (भा.द.वि. कलम 353, 186, 141, 145, 147, 149) गुन्हा दाखल
केला आहे. या गुन्ह्यातील वरील तीन आरोपीना आज दि. 6 मे 2015 रोजी अटक
केलेली असून पुढील तपास पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे पीएसआय आर. एम. शेख हे
करत आहेत.