श्री विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयातील 3 विद्यार्थ्यांंची इंन्डस इंडिया बॅकेत निवड

पंढरपूर लाईव्ह दि. 07-05-2014

      पुणे येथील इंन्डस इंडिया बॅकेत झालेल्या मुलाखतीत या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या या बॅकेसाठी श्री विठ्ठल एज्युकेषन अ‍ॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील एम.बी.ए. विभागातून 3विद्यार्थ्यांंची इंटरव्यूहद्वारे निवड करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी दिली.

      इंन्डस इंडिया बॅक या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बँकींग क्षेत्रात या बॅकेचे षाखा प्रबंधक विजय परदेषी व त्यांच्या निवड समितीने घेतलेल्या इंटरव्यूहमध्ये गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील एम.बी.ए.विभागातील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. मुलाखतीतून विद्यार्थ्यांंंच्या गुणात्मक अभ्यासाबरोबरच कमालीची षिस्त, आदरयुक्त संबंध व उत्कृष्ट षिक्षण पध्दती यामुळे निवड समिती अत्यंत प्रभावित
छायाचित्रात:-
1.    गणेष अरूण सपकाळ,
2.    अभिजीत अनुरत्न व्यवहारे
3.    नितीन भारत रणपिसे
झाली. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून गणेष अरूण सपकाळ, अभिजीत अनुरत्न व्यवहारे व नितीन भारत रणपिसे या 3 विद्यार्थ्यांंची आपल्या बॅकेकरिता निवड केली. एम.बी.ए.चे हे सातवे वर्ष असून अभियांत्रिकीप्रमाणेच एम.बी.ए.ला देखील भरघोस यष मिळत असून, गेल्या सहाही वर्षातील एम.बी.ए.चे विदयार्थी हे विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यामध्ये स्थिर असल्याचे सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे यांनी सांगितले. सदर विद्यार्थ्यांंना ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागाचे डॉ.माधव राऊळ,तसेच एम.बी.ए.विभाग प्रमुख प्रा.सी.सी.पतंगे,प्रा.एम.एम.भोरे, प्रा.आर.आर.भोसले, प्रा.एस.ए.जगताप,

प्रा.एम.आय.बोहरी या प्राध्यापकांचे मार्गदर्षन लाभले असून संस्थेचे अध्यक्ष धनंजय सालविठ्ठल,उपाध्यक्ष एन.एस.कागदे,संस्थापक सचिव सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे,ज्येष्ठ विष्वस्त दादासाहेब रोंगे,सचिव व प्राचार्य डॉ. रोंगे तसेच सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे यांच्या व्यवस्थापनातील सदस्य, रजिस्ट्रार राजेद्र झरकर, अधिष्ठाता व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग,षिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांंचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांंच्या निवडीमुळे षिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच नोकरीची संधी उपलब्ध झाल्यामुळे विषेषत:पालक वर्गात आनंदाचे वातावरण पसरल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे.