सलमान खानला दोन दिवसांचा अंतरिम जामीन, तूर्तास तरी तुरुंगवास टळला!
पंढरपूर लाईव्ह
मुंबई: अभिनेता सलमान खानला मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरता दिलासा दिला आहे. कोर्टाने त्याला दोन दिवसाचा अंतरिम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे तूर्तास तरी सलमानचा तुरुंगवास टळला. निकालाची सर्टिफाईड कॉपी मिळाल्यानंतर शुक्रवारी हायकोर्टात पुन्हा सुनावणी होईल.
हिट अँड रन प्रकरणी अभिनेता सलमान खानला सत्र न्यायालयाने 304 आणि 305
कलमा अंतर्गत 5 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. 13 वर्ष सुरु असलेल्या या
खटल्याचा निकाल अखेर आज सुनावण्यात आला. सलमान खानला या प्रकरणात सर्व
आरोपात दोषी ठरविण्यात आलं. यानंतर त्याला थेट तुरुंगात नेण्याची शक्यता
होती मात्र मुंबई उच्च न्यायालायाने त्यांचा अंतरिम जामीन मंजूर केल्यामुळे
सध्या तरी सलमानचा तुरुंगवास टळला आहे.
तीन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्याने जामीनासाठी सलमानला हायकोर्टात अर्ज करावा लागला. हायकोर्टाने सलमानच्या अर्जावर निर्णय देताना दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. हायकोर्टातून जामीन मिळवण्यासाठी सलमानकडे अवघे तीनच दिवस आहेत. कारण हायकोर्टाच्या उन्हाळी सुट्ट्या 10 मे पासून सुरू होणार आहेत. पुढे हायकोर्टाचं नियमित कामकाज 7 जूनपासून सुरू होईल.