सलमानने केलेल्या अपघातानंतर आयुष्यातून उठला... मुख्य साक्षीदार पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र पाटील..!
पंढरपूर लाईव्ह
मुंबई : बहुचर्चित अशा सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन'
प्रकरणाचा आज निकाल लागलाय. सलमान या प्रकरणात दोषी आढळलाय... त्याला पाच
वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय तसंच २५ हजारांचा दंडही ठोठावण्यात आलाय.
पण, ही शिक्षा रविंद्र पाटीलच्या उद्ध्वस्त आयुष्यासमोर काहीच नाही...
रविंद्र पाटीलचा एकच गुन्हा होता आणि तो म्हणजे, या अपघाताच्या वेळी पोलीस
कॉन्स्टेबल असलेला २४ वर्षांचा रविंद्र सलमानच्या सोबतच त्याचा बॉडीगार्ड
म्हणून उपस्थित होता... आता तो या जगात नाही... ३ ऑक्टोबर २००७ रोजी
रविंद्रचा डिप्रेशननं आणि क्षयरोगानं बळी घेतला.
रविंद्रनं दाखल केली होती एफआयआर...
याच रविंद्र पाटीलनंच सलमानच्या गाडीच्या अपघातानंतर पहिल्यांदा एफआयआर
दाखल केली होती. वांद्रे पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रितसर तक्रार दिली होती.
मूळचा धुळ्याचा असलेला रवींद्र पाटील १९९८ बॅचचा पोलीस कॉन्स्टेबल....
मुंबई पोलिसांच्या प्रोटेक्शन युनिटमध्ये कार्यरत होता. रवींद्रचे दोन्ही
मोठे भाऊसुध्दा पोलीस दलातच कार्यरत होते.
रविंद्रनं कोर्टात दिली होती खरी साक्ष... रविंद्र हा या प्रकरणातला महत्त्वाचा साक्षीदार होता... रविंद्रनं वांद्रे
कोर्टात, सलमाननं जे डब्ल्यू मॅरिएट हॉटेलहून घरी जाण्यासाठी गाडी काढली
आणि वेगाने वांद्रेच्या दिशेने निघाला... यावेळी तो मद्य प्यायलेला होता...
आपण त्याला याबद्दल जाणीव करून दिली होती, अशी साक्षही दिली होती.
रविंद्रवरचा दबाव वाढला... यानंतर, 'हिट अॅन्ड रन' प्रकरणामुळे रविंद्रवरचा दबाव वाढला होता. तो
कोर्टात वकिलांच्या प्रश्नांना उत्तरं द्यायलाही घाबरत होता. त्यामुळेच तो
डिप्रेशनमध्ये गेला...
पोलिसांचीच रविंद्रला वाटत होती भीती... सीनिअर पोलीस अधिकाऱ्यांनी नोकरीवर अनुपस्थित राहिल्याचा आरोप लावून
रविंद्रला नोकरीवरून काढलं होतं. त्यानंतरही पोलिसांनी त्याचा पिच्छा
पुरवला... त्यामुळे रविंद्रच्या डिप्रेशनमध्ये अजूनच वाढ झाली. त्यानं
मुंबई सोडली आणि दुसरीकडे निघून गेला.
कुटुंबीयांपासूनही दूर झाला रविंद्र... मुंबई सोडल्यानंतर रविंद्र अनेकदा चोरून लपून आपल्या पत्नीला आणि
कुटुंबीयांना भेटण्यासाठी एक-दोन दिवसांसाठी मुंबईला येत होता.
कुटुंबीयांनीही त्याला या प्रकरणातून काढता हात घेण्याचा सल्ला दिला होता
पण रविंद्रनं त्यांचं ऐकलं नाही...
साक्ष बदलण्यासाठी दबाव... रविंद्रसोबत जे काही मोजके लोक होते त्यांच्या म्हणण्यानुसार सलमान खान
प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी रविंद्रवर खूप जास्त दबाव होता. परंतु,
रविंद्रनं शेवटच्या श्वासापर्यंत आपली साक्ष बदलली नाही. कुठलीही लाच
त्यानं स्वीकारली नाही. धमक्यांना भीक घातली नाही.
कोर्टात अनुपस्थित राहण्यासाठी तुरुंगवास...सलमान खान प्रकरणात कोर्टात अनुपस्थित राहण्याच्या आरोपाखाली रवींद्रला
जेलमध्ये धाडण्यात आलं. आपल्याला तुरुंगात वाईट वागणूक मिळत असल्याचं सांगत
रविंद्रनं आपल्याला तुरुंगात सीरियल किलर्सपासून दूर ठेवण्याची विनंती
कोर्टात केली होती. पण, त्याची ही मागणी फेटाळण्यात आली.
भीक मागण्याची वेळ... कुटुंबापासून वेगळा झाल्यानंतर रविंद्र बेपत्ता झाला होता... त्याचा
ठावठिकाणा कुणालाही माहीत नव्हता. या काळात त्याला रस्त्यावर भीक मागताना
अनेकांनी पाहिल्याचं सांगितलं जातं.
दारूचं व्यसन... आणि क्षयरोग...२०००७ मध्ये तो सेवरी म्युनिसिपल हॉस्पीटलमध्ये सापडला. खूप दारू
प्यायल्याचा परिणाम म्हणून रविंद्रला क्षयरोग (टीबी) झाला होता. त्यामुळे,
त्याच्यावर औषधांचा कोणताही परिणाम झाला नाही... आणि खंगून खंगून रविंद्रनं
याच हॉस्पीटलमध्ये ३ ऑक्टोबर २००७ रोजी अखेरचा श्वास घेतला. यावेळी,
त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबीयांपैकीही कुणी उपस्थित नव्हतं.
न्यायालयानं रविंद्रची साक्ष ग्राह्य धरली...
रविंद्रच्या मृत्यूनंतर २०१४ साली जेव्हा सलमान खानवर सदोष मनुष्यवधाच्या
आरोपाखाली खटला पुन्हा सुरू झाला तेव्हा रविंद्रनं वांद्रे मॅजिस्ट्रेट
कोर्टात दिलेली साक्ष ग्राह्य धरण्याची सरकारी वकिलांची मागणी मान्य
करण्यात आली... सलमान खानच्या 'हिट अॅन्ड रन' प्रकरणात रविंद्रच्या
मृत्यूनंतरही त्याची अगोदर नोंदवलेली साक्ष खूप महत्त्वाची ठरली.
************
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!
अॅन्ड्रॉईड अॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे. आज दि. 6-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 92 हजार 649 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 9 हजार 200 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..! पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे