यमाई तलावाच्या सुशोभिकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे स्पेशल व्हिडीओ रिपोर्ट राज्य शासनाचे व पंढरपूर नगरपरिषदेचे 2 कोटी 92 लाख रु. पाण्यात कॉन्ट्रॅक्टरने विहीत कामे निकृष्ट दर्जाची केल्याचा नागरिकांचा आरोप

पंढरपूर लाईव्ह विशेष रिपोर्ट

दि. 21 मे 2015

तिर्थक्षेत्र पंढरपूर शहरात  नगरपरिषदेने पंढरपूरकरांच्या साठी कांही गौरवास्पद व अत्यंत


उपयुक्त ठरतील अशा कांही गोष्टी निर्माण केल्या आहेत. यामध्ये दोन बागा (जिजाऊ व पद्मावती), एक पोहण्यासाठीचा तलाव (पद्मावती) व तिसरे म्हणजे यमाई तलाव व त्यावरील फिरण्यासाठीचा ट्रॅक यांचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. मात्र पंढरपूरकरांचे दुर्दैव हे की, नगरपरिषदेच्या ढिसाळ नियोजनामुळे वरील सर्व ठिकाणे आज विर्दीण अवस्थेत आहेत.


आज पंढरपूर लाईव्ह वर आपण यमाई तलावाच्या दुरावस्थेबाबत चा खास व्हिडीओ आम्ही खास नागरिकांच्या आग्रहास्तव  तयार केला आहे.

बघा व्हिडीओ-1 भगवान वानखेडे 




         

पंढरपूर शहरातील यमाई (टाकळी) तलावाच्या पर्यावरर्णीय दृष्ट्या संवर्धन करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेने तयार केलेल्या विकास आराखड्यासाठू महाराष्ट्र राज्य शासन योजनांतर्गत योजनतेली राज्य सरोवर संवर्धन योजनेतून 2 कोटी 92 लाख खर्च करुन यमाई तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले. मात्र हे काम ज्या कॉन्ट्रॅक्टरने केले ते अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्याचे आज पंढरपूरकरांच्या निदर्शनास येत आहे. आज या तलावाची व यावरील ट्रॅकची  दुरावस्था व इतर असुविधा पाहिल्या तर सामान्यातल्या सामान्य माणसालाही याबाबत बोलता येईल ते असे की, एक तर  हे काम करणार्‍या कॉन्ट्रॅक्टरने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे किंवा सुशोभिकरणानंतर ची देखभाल करण्याचे कर्तव्यामध्ये नगरपरिषदेने कानाडोळा केलेला आहे.

खालील व्हिडीओत बघा प्रतिक्रिया:-

प्रतिक्रिया जेष्ठ पत्रकार श्री.सिध्दार्थ ढवळे (सर)

प्रतिक्रिया ह.भ.प.श्री.प्रकाश वाघमारे


 


 

प्रतिक्रिया पत्रकार राजकुमार शहापूरकर

 

प्रतिक्रिया श्री.संजय म्हमाणे (व्यापारी)

 

प्रतिक्रिया श्री.संजय म्हमाणे (व्यापारी)2

 

प्रतिक्रिया श्री.राजू पुरंदरे (कलाकार)

प्रतिक्रिया सौ. ललीता कोळवले मॅडम (अध्यक्षा लायनेस क्लब, पंढरपूर)

प्रतिक्रिया श्री. बाळासाहेब आराध्ये (सर)

 

तलावाच्या ट्रॅकची ही दुरावस्था... बघा व्हिडीओ:-

 

 

ट्रॅकच्या दुरावस्थेमुळे तलावाला लागून असलेल्या या कच्च्या अंधार्‍या मार्गावरुन नागरिक असे धोका पत्करुन फिरत आहेत. बघा व्हिडीओ:-

तलावाच्या ट्रॅकवरुन बिनदिक्कत ये-जा करणारे मोटारसायकलस्वार बघा व्हिडीओ:-

 


यमाई तलावाच्या प्रमुख प्रवेशद्वारावर अंधाराचे साम्राज्य बघा व्हिडीओ:-

 

ट्रॅकवरील पथदिवे बंद अवस्थेत बघा व्हिडीओ:-

 

यमाई तलावाजवळ असलेली एमएसईबी चा डीपी धोकादायक.. वारे आल्यास उडतात ठिणग्या.. बघा व्हिडीओ:-

 

पंढरपूर लाईव्हसी बोलताना येथे येणार्‍या अनेक नागरिकांनी प्रामुख्याने येथील असुविधांबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. यामध्ये  खालील बाबींचा समावेश आहे.


1) यमाई तलावावरील ट्रॅक च्या फरशा ठिकठिकाणी उचकटलेल्या आहेत. यामुळे जेष्ठ  नागरिकांना ट्रॅकवर फिरताना तारेवरची कसरत करावी लागते.

2) येथे अनेकांना सर्पदंश झालेला आहे. अनेकदा ट्रॅकवर विषारी सर्प फिरताना आढळतात. त्यामुळे भीतीचे वातावरण असते.

3) येथील ट्रॅकवरचे कांही पथ दिवे बंद आहेत. त्यामुळे अक्षरश: मोबाईलच्या बॅटरीच्या प्रकाशात ट्रॅकवरील फेरी पुर्ण करावी लागते.

4) येथे सुरक्षा रक्षक असणे आवश्यक आहे.  कारण तलावावरील ट्रॅकवर फिरायला येणार्‍या नागरिकांव्यतीरिल्त येथे अनेक टवाळखोर मंडळी व वाईट उद्देशाने येणार्‍या महाभागांची गर्दी ही हल्ली वाढलेली आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी महिला व वयोवृध्दांच्या सुरक्षेसाठी तरी येथे कांही सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक आहे.

5) या ठिकाणी शुध्द पिण्याच्या पाण्याची कायमस्वरुपी  व्यवस्था असावी.

6) ट्रॅकवर पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र शौचालयांची व्यवस्था असावी. जिथे पुरेसा प्रकाश व पाणी असावे.

7) उर्वरीत ट्रॅकची कामे व दुरुस्तीची वेळेत पुर्ण व्हावीत.

8) ट्रॅकलगत असलेल्या कच्च्या मार्गावरुज अनेक मोटारसायकल स्वार ये-जा करत असतात. वस्तूत: येथे गाड्या आणणेस बंदी आहे मात्र ही बंदी झुगारुन अनेकजण दंडेलशाही करत येथून बिनदिक्क्त फिरताना आढळतात. यामुळे फिरायला येणार्‍या नागरिकांना धुळीचा त्रास होतो. भरधाव वेगात जाणार्‍या या बाईकर्समुळे अपघाताची शक्यता टाळता येणारी नाही. त्यामुळे यासाठी वेळीच बंदोबस्त होणे आवश्यक आहे.

 

 कामे नगरपरिषदेने वेळीच पुर्ण करण्याच्या दृष्टीने पावले उचलली तर या ठिकाणी दररोज मोठ्या संख्येने फिरावयास येणारे पंढरपूरकर नक्कीच कृतकृत्य होतील.

नगरपरिषदेचे नगरसेवक, मुख्याधिकारी व लोकनेते याकडे तत्परतेने लक्ष देवून नागरिकांच्या समस्या सोडवतील हीच अपेक्षा.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 21-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 1 हजार 738 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  16-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 434  झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399

आज दि.  रोजी आज दि. 15-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 99 हजार 276 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  15-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 102 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399