पंढरपूरमधील के.बी.पी. चौक प्रवासासाठी खतरनाक अपघातांचे वाढते प्रमाण...क्रांतीसिंह नाना पाटील चौकात वेगवेगळ्या अपघातात बळी गेलेल्या कित्येक निष्पाप जीवांना न्याय मिळेल का? बघा व्हिडीओ रिपोर्ट

पंढरपूर लाईव्ह विशेष रिपोर्ट
दि. 19 मे 2015


             * क्रांतीसिंह नाना पाटील चौकात वेगवेगळ्या अपघातात बळी गेलेल्या कित्येक निष्पाप जीवांना न्याय मिळेल  का?

* संवेदना शुन्य झालेले लोकप्रतिनिधी येथील बिघडलेली वाहतुक व्यवस्था आणि विदीर्ण झालेल्या या चौकाच्या सुशोभिकरणाकडे लक्ष देणार केंव्हा?

* काय म्हणणे आहे याबाबत प्रशासकीय अधिकार-यांचे?

* संपुर्ण सत्य.. रोखठोक वृत्त..

* स्थानिक नागरिकांच्या भावनिक प्रतिक्रियांसह...

 वाहतुक पोलिस या चौकात नसलेमुळे अवजड वाहतुकदार कसे वाहतुकीचे नियम तोडतात - व्हिडीओ बघा:-



या चौकात असलेली पोलिस चौकी, असून अडचण नसून खोळंबा- बघा व्हिडीओ:-



पंढरपूर लाईव्ह वर पंढरपूरमधील क्रांतीसिंह नाना पाटील चौक म्हणजेच के.बी. पी. चौकातील विस्कळीत वाहतुकीमुळे घडलेल्या अनेक अपघाताबाबत बातम्या प्रसिध्द झाल्या.
याचबरोबर या ठिकाणी कोणत्या उपाययोजना केल्या तर अपघात टाळले जातील याबाबतचे विविध रिपोर्टही प्रसिध्द केले मात्र संबंधीत अधिकारी व लोकप्रतिनिधी या बाबतीत उदासिन भुमिका घेताना आढळले आहेत. आज आमच्या टीमने खास या चौकात जाऊन कशाप्रकारे वाहतुकीची कोंडी होते वगैरे संदर्भात एक व्हिडीओ रिपोर्ट तयार केला. याद्वारे येथील वाहतुकीचा आणि इतर कांही बाबींचा प्रश्‍न किती मोठा आहे याचे वास्तववादी चित्रण आणि नागरिकांच्या कांही प्रतिक्रिया बघा....


 

कायम नादुरुस्त असलेला चौकातील चबुतरा बघा व्हिडीओ:-



अवजड वाहतुकीसाठी असलेला बाह्य वळण (बायपास) रस्ता साधा नामफलक सुध्दा नाही. बघा व्हिडीओ:-



श्री.राजेंद्र भोसले (सर) प्रतिक्रिया व्हिडीओ बघा:-



श्री.रविराज सोनार (साहित्यीक) प्रतिक्रिया व्हिडीओ बघा:-



विद्यार्थीनी प्रतिक्रिया 1 व्हिडीओ बघा:- 



विद्यार्थीनी प्रतिक्रिया 2 व्हिडीओ बघा:- 



सौ. राजश्री लोंढे (सामाजिक कार्यकर्त्या इसबावी) प्रतिक्रिया व्हिडीओ बघा:-


पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. नावंदेसाो वाहतुक व्यवस्थेसंदर्भात काय म्हणाले?

पंढरपूर शहर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक श्री. नावंदेसाो  यांचेशी मोबाईलवरुन संपर्क साधला असता  वाहतुक व्यवस्थेसंदर्भात बोलताना ते म्हणाले की, आमचेकडे या चौकात वाहतुक पोलिसांची नेमणुक करण्यासाठी पुरेसा स्टाफ नाही. मात्र या संदर्भात लवकरच ठोस निर्णय घेवून येथील वाहतुक व्यवस्था सुरळीत करणेसाठी प्रयत्न करु. श्री. नावंदेसाो यांनाही समक्ष भेटून त्यांना सद्यस्थिती चे दर्शन घडवून येथील वाहतुक व्यवस्था कायमस्वरुपी सुरळीत होणेसाठी पंढरपूर लाईव्ह पुढील काळात निश्‍चित प्रयत्नशिल असेल.
 

सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर चे प्रभारी कार्य. अभियंता श्री. गावडेसाो काय म्हणाले ?

याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग पंढरपूर चे प्रभारी कार्य. अभियंता श्री. गावडेसाो यांचेशी त्यांच्या मोबाईल वर  पंढरपूर लाईव्ह ने  संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, के..बी.पी. चौकातील चबुतरा हा वाहतुक अवजड वाहनांच्या धडकेमुळे वारंवार पडतो त्याचे तात्पुरत्या स्वरुपात आम्ही दुरुस्ती करुन घेतो. मात्र वारंवार अवजड वाहतुकीच्या चालकांच्या चुकामुळे हा चबुतरा पुन्हा नादुरुरस्त होतो. या चबुतर्‍याच्या पुनर्बांधणीसाठी सध्या निधी उपलब्ध नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येथील अवजड वाहतुकीसाठीचा बायपास रस्ता हा नगरपरिषदेच्या हद्दीत येतो. तेथील दिशादर्शक नामफलक बसविणेचे काम नगरपालिकेचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  ते बाहेर असलेमुळे त्यांचेशी यासंदर्भात विस्ताराने बोलता आले नाही. मात्र लवकरच पंढरपूर लाईव्ह या संदर्भात त्यांचेशी समक्ष भेटून या चौकातील सुशोभिकरणाविषयी  तसेच इतर बाबीं विषयी च्या प्रश्‍नांची उत्तरे शोधून काढील.

आकारमानाने हा चौक लहान...

वाहतुकीची कोंडी ही नेहमीची बाब...

या चौकातून होते मोठी रहदारी....

भरधाव वेगाने येणार्‍या अवजड वाहनांचा राबता याच चौकातून....

चौकातील चबुतरा असून अडचण नसून खोळंबा...

कायमस्वरुपी ट्रॅफिक पोलिसांची नियुक्ती हवी...

या चौकानजीक असणार्‍या के.बी.पी. पाटील कॉलेज समोर गतीरोधक बसवले होते. मात्र हे गतीरोधक गायब झालेले आहेत. त्यामुळे भरधाव वेगात धावणार्‍या वाहनांना इथे ‘ब्रेक’ लागत नाही... ब्रेक बसतोय तो सर्वसामान्यांच्या काळजाला... कधी कुठून कोणते वाहन येवून आपणास धडकेल या भीतीने या चौकातून महिला व वयोवृध्द नागरीक तसेच विद्यार्थी जीव मुठीत धरुन प्रवास करत असतात.

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 19-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 00976 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  16-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 330झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399

आज दि.  रोजी आज दि. 15-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 99 हजार 276 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  15-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 102 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399