पंढरपूर अर्बन बँकेने समाजात नावलौकिक मिळविला.. पंढरपूर अर्बन बँकेने समाजात नावलौकिक मिळविला.. -श्री.हरिभाऊजी बागडे

पंढरपूर लाईव्ह:-

पंढरपूर - शतकमहोत्सवी दि.पंढरपूर अर्बन को-ऑप बँकेच्या शाखा-साखरपेठ, सोलापूर चा नुतन वास्तुचा लोकार्पण सोहळा विधानसभेचे सभापती मा.श्री.हरिभाऊजी बागडे यांचे शुभहस्ते नुकताच पार पडला. उद्घाटनप्रसंगी वास्तुच्या कोनाशिलेचे अनावरण हरिभाऊजी


बागडे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बँकेचे चेअरमन श्री.प्रशांत परिचारक म्हणाले की, सोलापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणार्‍या पंढरपूर अर्बन बँकेची 42 वर्षापुर्वी साखरपेठ, सोलापूर येथे शाखा स्थापन झाली. शहरातील यंत्रमाग व्यावसायिक, भांडवलदारांना मराठी, कन्नड, तेलगु, हिंदी अशा बहुभाषिकांची राजधानी असणार्‍या सोलापूर शहारातील ग्राहकांनी बँकेवर जो विश्‍वास दाखविला आहे, त्यांच्या विश्‍वासास आम्ही सदैव पात्र राहून अधिक दर्जेदार सुविधा देण्यास निश्‍चितच प्रयत्नशील राहू असे आश्‍वासन दिले. याप्रसंगी केंद्र सरकारची प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना’’ व पंतप्रधान जीवन सुरक्षा योजना’’ खातेदारांसाठी लवकरच कार्यान्वित करणार असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले.


कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी बोलताना कार्यक्रमाचे उद2घाटक मा.श्री.हरिभाऊजी बागडे म्हणाले की, सहकारी बँकामध्ये अनिश्‍चितचे वातावरण आहे. सहकारी संस्था चालविणे हे जिकरीचे काम आहे.  सहकार पर्वानंतर 100 वर्षामध्ये अनेक बँका स्थापन झाल्या असतील, कालांतराने त्या डबघाईला गेल्या मात्र विश्‍वासाची शंभरी पुर्ण करण्यात पंढरपूर अर्बन बँक सक्षम ठरली आहे. श्री.सुधाकरपंत परिचारक व श्री.प्रशांत परिचारकांसारखे सक्षम नेतृत्व बँकेला लाभले असल्याने संस्थेची प्रगती निश्‍चीतच कौतुकास पात्र आहे. बँकेचे सी.आर.आर. रेषो उत्तम असून संस्थेची प्रगती दर्शवितो. बँकेचा नफा सभासद, ग्राहकांच्या कल्याणासाठी वापरला जात असून सामाजिक बांधिलकीचे हित बँक जोपासत आहे.
महाराष्ट्रातील ग्राहकांचा विश्‍वासस पात्र असणार्‍या पंढरपूर अर्बन बँकेचा समाजात फार मोठा नावलौकीक असून प्रामाणिकपणा, निष्ठा व सचोटी याच्या जोरावरच बँक यशाची शिखरे पादाक्रांत करीत आहे. बँकेच्या पुढील उज्वल वाटचालीस याप्रसंगी त्यांनी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात बँकेचे कुटुंबप्रमुख सुधाकरपंत परिचारक म्हणाले की, संस्थापकांनी घालून दिलेल्या आदर्श मापदंडावरती बँकेचे कामकाज चालू आहे. ग्राहकांच्या बदलत्या आकांशाचा वेध होत त्यांना दर्जेदार सोई-सुविधा देणेसाठी साखरपेठ शाखा नव्या वास्तुमध्ये आपणासमोर येत आहे. आधुनिक सोयी-सुविधा देऊन बँकी ंग सोपे करण्यावर आमचा भर असेल असे ही ते म्हणाले, सदर कार्यक्रमाप्रसंगी श्री.बिपीनभाई पटेल, जेष्ठ साहित्यीक श्री.गो.मा.पवार, डॉ.नितीन ढेपे, शाखा सल्लागार श्रीकिसन लाहोटी, संगमेश्‍वर रघोजी, श्री.लक्ष्मणराव ढोबळे, बँकेचे संचालक श्री.सतिश पुरंदरे, श्री.रा.पा.कटेकर, श्री.पुरूषोत्तम खडके, श्री.गोपाळ बडवे, श्री.दिपक शेटे, श्री.बाळासाहेब देहुकर, मेधा दाते आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करणेसाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.लक्ष्मण डिंगरे, जनरल मॅनेजर श्री.उमेश विरधे, श्री.गोविंद लाहोटी, शाखाधिकारी श्री.कृष्णकुमार पेंडाल, श्री.उमेश कुलकर्णी, श्री.संजय पाठक, श्री.विजय माने सर्व कर्मचारी बंधु परिश्रम घेतले.
*****

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाहून अधिक...!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप  10 हजार 821 मोबाईलमध्ये पोहोचले!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.

  आज दि.  रोजी आज दि. 26-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 1 लाख 4 हजार 259 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या

‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप पोहोचले 10 हजाराहून अधिक मोबाईल मध्ये...!

संबंध महाराष्ट्रातूनच नव्हे तर जगभराच्या कानाकोपर्‍यातील मराठी माणसांनी आपल्या मोबाईल मध्ये ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेतले आहे. आज हे अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या 10 हजाराहून अधिक झालेली असून दिवसेंदिवस हा आकडा वाढत आहे. 

आज दि.  26-5- 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ हे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप घेणार्‍या मोबाईल धारकांची संख्या   10  हजार 821 झालेली  आहे. 


‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399