स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष मोहिमेसाठी वेळेत उपस्थित रहावे-प्रांतधिकारी-संजय तेली

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर-दि.09:- स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिम शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी पंढरपूर शहरात राबविण्यात येणार असून, शहर स्वच्छतेसाठी अधिकारी व कर्मचा-यांनी दिलेल्या निवासाच्या व कामकाजाच्या ठिकाणी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन प्रांतधिकारी संजय तेलीयांनी केले आहे.

 

 स्वच्छता मोहिमेसाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात आले असून, माळशिरस तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी - वाखरी पालखी तळ, माढा व करमाळा तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी - चंद्रभागा एस.टी.स्टॅण्ड, मार्केट यार्ड समोर, सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी - केंद्रे महाराज मठ,सांगोला रोड, मोहोळ तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी -न.पा.गट.नं.59 (65 एकर प्रांगण) शेगांव दुमाला, बार्शी व अक्कलकोट तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी तनपूरे महाराज मठ, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी चंद्रभागा नदी पात्र पुंडलिक मंदीर, सोलापूर म.न.पा येथील अधिकारी व कर्मचा-यांनी- दत्त घाट, जिल्हा मुख्यालय सोलापूर कार्यालयातील अधिकारी व कर्मचा-यांनी गोपाळकृष्ण मंदीर चौफाळा तसेच पंढरपूर तालुक्यातील अधिकारी व कर्मचा-यांनी प्रांत कार्यालय येथे उपस्थित रहावे. सर्व अधिकारी व कर्मचा-यांनी नेमूण दिलेल्या ठिकाणी स्वच्छतेसाठी लागणा-या विविध साधन सामुग्रीसह सकाळी 6.30 वाजता उपस्थित स्वच्छता मोहिमेसाठी आलेल्या कर्मचा-यांची तालुकानिहाय निवासव्यवस्था पुढील प्रमाणे  करण्यात आली आहे. माळशिरस तालुका - श्रीराम मंगल कार्यालय, इसबावी दुध डेअरी शेजारी माढा व करमाळा तालुका - दिगंबर महाराज मठ,रिलायन्स पंपाजवळ नविन पुल रोड, सांगोला व मंगळवेढा तालुका - केंद्रे महाराज मठ, सांगोला रोड, मोहोळ तालुका - साधुसेवा समिती तीन रस्ता सोलापूर रोड, बार्शी  व अक्कलकोट तालुका -तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, उत्तर व दक्षिण सोलापूर तालुका -पद्मशाली  धर्मशाळा, जुनी नगर पालिका इमारत जवळ, जिल्हा मुख्य कार्यालय, सोलापूर व म.न.पा सोलापूर- श्री  ह.भ.प. धोडोपंत दादा महाराज मठ,विप्रदत्त घाट व पंढरपूर तालुका- प्रांत कार्यालय, पंढरपूर येथे निवास  व्यवस्था करण्यात आली आहे.

निवास व्यवस्थेविषयी काही अडचणी आल्यास प्रांत कार्यालय पंढरपूर येथे सहाय्यता कक्षाची  स्थापना करण्यात आली आहे. हा सहाय्यता कक्ष शुक्रवार दिनांक 10 एप्रिल 2015 रोजी दुपारी 2.00 ते रात्री 12.00 वाजेपर्यंत सुरु राहणार असून, तलाठी ए.बी.चॉदकोटे (भ्रमणध्वनी - 9890061353) व के.पी. कटारे (भ्रमणध्वनी - 8275279706) तसेच दुरध्वनी क्रमांक-02186-223229 येथे संपर्क साधावा.

*************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 10 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 83 हजार 134 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 834 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399