पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर-दि. 11:- जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने आज शनिवार दिनांक 11 एप्रिल रोजी पंढरपूर शहरात जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वच्छ भारत अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली या मोहिमेंतर्गत सुमारे 80 मे.टन कचरा गोळा करण्यात आला. या स्वच्छता मोहिमेसाठी तालुकानिहाय नियोजन करण्यात आले होते. 


प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नामदेव पायरी पासून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या मोहिमेत जिल्ह्यातील सुमारे 9 हजार कर्मचा-यांनी आपला सहभाग नोंदविला. या सर्व कर्मचा-यांनी पंढरपूर शहरातील नदीपात्र (वाळवंट), वाखरी पालखी तळ, चंद्रभाग बसस्थानक, संतपेठ परिसर, महात्मा फुले चौक, तीन रस्ता परिसर, तनपुरे महाराज मठ, स्टेशन रोड, महाद्वार घाट, गोपाळकृष्ण मदिर, प्रांत कार्यालय त्याचबरोबर पंचायत समिती, सां.बा.विभाग, पोलीस कॉलनी, तहसील कार्यालय, रेल्वे स्टेशन आदी परिसरातील कचरा गोळा करुन तो परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता अभियानामध्ये 13 जेसीबी, 9 ट्रॅक्टर, 27 टीप्पर सहभागी झाले होते. त्याचबरोबर पंढरपूर नगरपालिकेसह जिल्ह्यातील सर्व नगरपालिकेच्या कर्मचा-यांनी आपला सहभाग उत्स्फुर्तपणे नोंदविला. या मोहिमेनंतर श्री. काकाणी यांनी विश्रामगृह ( पंढरपूर) येथे पत्रकार परिषद घेऊन उपस्थितीत पत्रकारांना या मोहिमेच्या यशस्वीतेबाबत माहिती दिली.

तसेच पुढील स्वच्छता मोहिमेत पंढरपूर शहरवासीयांनी आपला सहभाग नोंदवावा त्याचबरोबर शहर स्वच्छ ठेवण्यास नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले. भविष्यात ही स्वच्छता मोहिम जिल्हा प्रशासनातर्फे सुरुच ठेवणार असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले. या स्वच्छता मोहिमेत अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रवीण देवरे, निवासी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी दिनेश भालेदार, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश चव्हाण, प्रांतधिकारी शहाजी पवार, श्रीमंत पोटोळे, संजय तेली, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण श्रीमती मनिषा फुले, जिल्हा क्रिडा अधिकारी
भाग्यश्री बिले, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, सर्व न.प. मुख्याधिकारी, सर्व शासकीय कार्यालयातील कार्यालयीन प्रमुखांसह ,कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 11 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 83 हजार 420 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 874  झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399