पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात

पंढरपूर लाईव्ह

नवी दिल्ली : पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये पुन्हा एकदा कपात करण्यात आलीय. इंडियन ऑईल कॉर्पोरेशननं (आयओसी) बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कपात करण्याची घोषणा केली. नव्या किंमती बुधवारी रात्रीपासून लागू होतील. 

मिळालेल्या माहितीनुसार, पेट्रोल ४९ पैसे तर डीझेल १.२१ पैसे प्रति लीटर स्वस्त झालंय. यामुळे, आता राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पेट्रोल ६० रुपये प्रति लीटर तर डिझेल ४८.५० रुपये प्रति लीटर मिळेल. तर आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल ६७.६५ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ५५.८७ रुपये प्रति लीटर मिळेल.
एक एप्रिलपासून नागरिकांना पेट्रोल डिझेलच्या किंमतींमध्ये थोडा दिलासा मिळण्याची शक्यता याअगोदरपासूनच व्यक्त केली जात होती.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत घट झाल्याचं ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी म्हटलंय.
यानंतर सीएनजी १.५ रुपये प्रति किलोग्रॅम आणि पीएनजी १ रुपये प्रती एससीएम कमी होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय.

********

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 1 एप्रिल  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   79 हजार 137 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 287 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.