सांगोला तालुक्यातील कोळी कुटूंबावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ धरणे आंदोलन कोळी महासंघ- महर्षी वाल्मीकी संघ- महादेव कोळी आदी संघटनेचा सहभाग

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):- सांगोला तालुक्यातील कडलास येथील ननवरे या कोळी समाजातील कुटूंबावर प्राणघातक हल्ला झाल्याच्या निषेधार्थ कोळी महासंघाचे राज्य अध्यक्ष रमेशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांच्या नेतृत्वाखाली समस्त महादेव कोळी समाजाच्या वतीने तहसिल कार्यालयासमोर तीव्र धरणे आंदोलन छेडण्यात आले. या आंदोलनात कोळी महासंघ, महर्षी वाल्मीकी संघ, महादेव कोळी आदी संघटनांनी सहभाग घेतला होता.


यावेळी कोळी महासंघाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष अरुणभाऊ कोळी यांनी सदर घटनेचा तीव्र निषेध करत समाजाच्या वतीने प्रमुख मागण्या करताना सांगितले की, ‘‘कडलास ता.सांगोला येथील ननवरे कुटूंबावर

झालेल्या हल्ल्याच्या गुन्ह्यात वापरलेले सहा ट्रॅक्टरपैकी चार ट्रॅक्टर त्वरीत जप्त करावेत, गुन्ह्यातील फरारी आरोपीपैकी सर्व आरोपींना त्वरीत अटक करावी, पीडीत कुटुंबाचे आरोपीने जाळलेले घर शासनाने स्वखर्चाने त्वरीत बांधून द्यावे, पीडीत कुटुंबाला शासकीय पोलिस संरक्षण कायमस्वरुपी मिळावे, पीडीत कुटुंबाला तातडीची आर्थिक मदत मिळावी आणि गुन्हा घडण्यापूर्वी एक महिना आधीपासूनच पोलिस कर्मचारी संजय राऊत हा जाणीवपुर्वक आरोपींच्या संगनमतीने व सांगणेवरुन सदर पीडीत कुटुंबाला रात्री-अपरात्री पोलिस स्टेशनमध्ये आणून धमकी देत असे सदर पोलिस कर्मचारी व मुख्य आरोपीचे महिनाभराचे कॉल डिटेल्स् ची तपासणी करुन चौकशी होऊन सदर पोलिस कर्मचार्‍यास या घटनेतील सहआरोपी करावे ’’ आदी मागण्या  7 दिवसात मान्य कराव्यात अन्यथा कोळी समाजावर झालेल्या या अन्यायाविरोधात लोकशाही मार्गाने आमरण उपोषण, मोर्चे, रास्ता रोको यासारखे आंदोलन कोळी महासंघ व महर्षी वाल्मीकी संघ व महादेव कोळी समाजाच्या वतीने करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. सदर घटनेतील 4 आरोपींना हंगामी जामीन दिल्याने कोळी समाजाच्या भावना दुखावल्या असून तीव्र झाल्या आहेत. या चार आरोपीकडून फिर्यादीस व त्यांच्या कुटूंबास धोका असल्यामुळे फिर्यादीस त्वरीत पोलिस संरक्षण द्यावे अशी मागणी करत कोळी समाजाचे कोणत्याच जातीधर्माबरोबर वैर नाही मात्र कोळी समाजावर जर कोण अन्याय करत असेल तर त्याची गय केली जाणार नाही असे विचार अरुणभाऊ कोळी यांनी व्यक्त केले.

यावेळी डी.वाय.एस.पी. पोलिस निरीक्षक श्री.कदम तसेच नायब तहसिलदार पी.ए.शेख यांना  वरील मागण्यांचे निवेदन देण्यात आले. फिर्यादी व कुटूंबाला पोलिस संरक्षण देऊ  तसेच बाकीच्या मागण्यांची पुर्तताही त्वरीत करु असे आश्‍वासन पोलिस अधिकार्‍यांनी दिले.  

या आंदोलनात कोळी समाजातील विविध स्तरावरील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरुण भाऊ लोणारी (कोळी) अक्कलकोट,  पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष लक्ष्मणराव शिरसट, रामभाऊ कोळी (राज्य उपाध्यक्ष), महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक भारत (दादा) करकंबकर, पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती लक्ष्मण तात्या धनवडे, पंढरपूर नगरपरिषदेचे नगरसेवक सुरेश नेहतराव, माजी नगरसेवक गणेश अधटराव, कोळी महासंघाच्या महिला जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रामेश्‍वरी माने, लताताई कोळी, भावना बिराजदार, दिपाली कोळी आदी मान्यवरांनी ही यावेळी आपल्या भावना व्यक्त करत सदर घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त केला.


या आंदोलनात सहभागी होण्यासाठी विठ्ठल कोळी जत, मस्के सर सांगली, सुरेश प्याटी श.अ.सोलापूर, अंकुश ननवरे कार्याध्यक्ष सोलापूर जिल्हा कोळी महासंघ, रणजित बळवंतराव तालुकाध्यक्ष सांगोला कोळी महासंघ, सोमनाथ कोळी पंढरपूर शहराध्यक्ष महर्षी वाल्मीकी संघ, रमेश कोळी (उचेठाण), दादा ननवरे, नागेश नेहतराव, संतोष नेहतराव, भैय्या ननवरे, किशोर सुरवसे, दिनेश अभंगराव, अभंगराव बुवा, अशोक अधटराव, विक्रम शिरसट, दत्ता कांबळे, भारत कोळी, रामभाऊ कोळी मोहोळ तालुकाध्यक्ष कोळी महासंघ, विशाल अभंगराव, समाधान कोळी, निपूल कोळी, प्रकाश कोळी, राजू ननवरे, विजय ननवरे कडलास व   अनेक कोळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***********************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 4 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 79 हजार 845 हजाराहून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 388 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399