डॉ. पंकज गायकवाड यांची इंडीयन मेडीकल असोशिएशनच्या (आयएमए) पंढरपूर तालुका अध्यक्षपदी निवड

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर-दि.01:-उपजिल्हा रुग्णालय पंढरपूर येथील वैद्यकीय अधिक्षक डॉ. पंकज गायकवाड यांची इंडीयन मेडीकल असोशिएशनच्या (आयएमए) पंढरपूर तालुका अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. डॉ.पंकज गायकवाड हे पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात सन 1996 पासून वैद्यकीय अधिकारी तर सन 2012 पासून ते वैद्ययकीय अधिक्षक म्हणून काम पहातात. डॉ.गायकवाड हे उप-जिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्णांना डायलेसिलची सुविधा, नवजात शिशु अतिदक्षता विभाग, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना तसेच आवश्यक वैद्यकीय सुविधा देण्याचे काम सक्षमपणे केलेले आहे. या निवडीने डॉ.गायकवाड यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.


तसेच इंडीयन मेडीकल असोशिएशनच्या (आयएमए) पंढरपूर तालुका  उपाध्यक्ष पदी डॉ.दीपा गुंडेवार, सचिव डॉ.मंदार सोनवणे, सहसचिव विनायक राऊत, कोषाध्यक्ष डॉ.संजय कोरे तर सहाय्यक कोषाअध्यक्ष डॉ.सायली लाड यांची बिनविरोध निवड झाली आहे. यावेळी माजी अध्यक्ष डॉ.महाडीक,  डॉ.देशपांडे, डॉ.व्होरा, डॉ.दोशी, डॉ.आपटे,डॉ. गुंडेवार, डॉ.बोरावके, यांच्यासह  आयएमए सदस्य उपस्थित होते.

*********

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 1 एप्रिल  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   79 हजार 137 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 287 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.