पंढरपूर लाईव्ह- :
काठमांडू: काल आलेल्या प्रलयंकारी भूकंपानंतर काठमांडू
शहर बेचीराख झालं आहे. असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. ऐतिहासिक वारसा
असलेल्या ‘धरहरा’ टॉवरही या तडाख्यातून सुटला नाही. नेपाळचे
पहिले पंतप्रधान भीमसेन थापा यांनी आपल्या मुलीसाठी बांधलेला आणि आता
भूकंपाच्या तडाख्यात जमीनदोस्त झालेल्या टॉवरची नेमकी कहाणी
‘धरहरा टॉवर’ची कहाणी
‘धरहरा टॉवर’ काठमांडूची ओळखच. पण धरणीमाता कोपली आणि उरला फक्त दगडविटांचा ढिगारा.
नेपाळची
ओळख असलेल्या धरहरा टॉवरच्या उभारणीची कहाणीही तितकीच विस्मयकारी आहे. ही
कहाणी आहे नेपाळच्या पहिल्या पंतप्रधानांची. त्यांचं नाव होतं भीमसेन थापा. भीमसेन
थापा एका नेपाळी सैनिकाचे पुत्र होते. पण तेव्हाचे राजकुमार रणबहादुर
थापाशी त्यांची पक्की मैत्री होती. याच मैत्रीनं भीमसेन थापा यांना नेपाळचा
पहिला पंतप्रधान बनवलं.
पंतप्रधान बनल्यानंतर भीमसेन थापा
यांनी 1826 साली आपल्या मुलीला एक अनोखी भेट दिली. ज्याचं नाव होतं भीमसेन
मीनार अर्थात, धरहरा टॉवर भीमसेन यांची कन्या याच टॉवरच्या
शिड्यांवरून नवव्या मजल्यावर जात असे आणि अवघ्या काठमांडूचा नजारा पाहत
असे. आपल्या मुलीला आपल्या पित्याच्या ताकदीचा गर्व होऊ नये यासाठी नवव्या
मजल्यावर एक शिवलिंगही स्थापित करण्यात आलं होतं. अनेक
पर्यटकांनी याच टॉवरवरून काठमांडू आपल्या नजरेत साठवलं होतं. पण धरणीनं
रौद्र रुप दाखवलं आणि 9 मजल्याचा टॉवर बनला फक्त मातीचा ढिगारा.
खरं तर भीमसेन यांनी असे दोन टॉवर बांधले होते. पण दोन्ही टॉवर 1934च्या भूकंपामध्ये जमीनदोस्त झाले.
तत्कालीन
पंतप्रधानांनी त्यातला एक टॉवर पुन्हा बांधला आणि त्याचं नामकरण झालं
धरहरा टॉवर. पण काळानं या टॉवरला पुन्हा कवेत घेतलं. शनिवारी सकाळी 160
पर्यटकांनी हा टॉवर पाहण्यासाठी तिकीट काढलं... पण
भूकंपाच्या एका झटक्यानं होत्याचं नव्हतं झालं. मीनार कोसळली. लोक मदतीसाठी
धावले. पण मदतकार्य सुरु असताना पुन्हा एकदा उर्वरित भाग कोसळलाच. 2005
सालीच हा टॉवर पर्यटकांसाठी खुला झाला होता. पण 10 वर्षांच्या सेवेनंतर
धरणीमातेनं त्याला पोटात घेतलं. उद्ध्वस्त झाला धरहरा टॉवर आणि काठमांडूचा
गौरवही.
*****
पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!
अॅन्ड्रॉईड अॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!
आपणास
कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अॅन्ड्रॉईड अॅप चे
जगाच्या कानाकोपर्यात असणार्या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे
स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब
पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण
जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 26 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 86 हजार 727 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज
पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अॅन्ड्रॉईड अॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 328 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.
आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!
आमचे ई-मेल आयडी jhanjavat@gmail.com livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे
मोबाईल क्रमांक 8308838111 / 8552823399