पंढरपूर लाईव्ह- :
पंढरपूर 24 : पंढरपूर तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी शासनाकडून जास्तीत जास्त निधी जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी देण्याचा प्रयत्न करीन, तसेच प्रशांत परिचारकांनी सुचविलेल्या कामासाठी निधीची कमतरता
पडणार नाही. तिर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रलंबित रस्त्याच्या कामासाठी तातडीची बैठक बोलावून
ती मार्गी लावू असे उद्गार सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
मा.ना.श्री.विजयकुमार देशमुख यांनी पंढरपूर नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित
सभापतींच्या सत्कार प्रसंगी व्यक्त केले.
पंढरपूर नगरपरिषदेमधील पंढरपूर विकास आघाडीचे नवनिर्वाचित
सभापती सुनिल डोंबे, शैलेश बडवे, निता सर्वगोड, स्थायी सदस्य दगडुशेठ
धोत्रे व सरूबाई ढोले यांचा सत्कार मा.ना.श्री.विजयकुमारजी देशमुख यांच्या
शुभहस्ते व मा.श्री.प्रशांतराव परिचारक, नगराध्यक्षा सौ.साधना नागेश भोसले
यांचे प्रमुख उपस्थितीत पंढरपूर अर्बन बँकेचे प्रशासकीय भवन येथे संपन्न
झाला.
पंढरपूर तिर्थक्षेत्र आराखडा, चतु:शताब्दी विकास आराखडा मधून शहराच्या विकासासाठी निधी उपलब्ध
झालेला आहे. परंतु अधिकार्यांच्या मनमानी कारभारामुळे कामे अत्यंत संथगतीने सुरू आहेत. त्यासाठी आपण वैयक्तीक लक्ष घालून बैठक बोलावून कामाचा वेग वाढवावा, तसेच पंढरपूरच्या अनेक अडी-अडचणी नगरसेवकांनी पालकमंत्र्यासमोर मांडल्या. नगरपरिषदेला देणेत येणारे सहाय्यक अनुदान अत्यंत तोकडे पडते त्यात पंढरपूरातील यात्रेचा विचार करून भरीव वाढ करणेत यावी अशी मागणी श्री.प्रशांत परिचारक यांनी केली.
याप्रसंगी पंढरपूर नगरपालिकेतील सर्व नगरसेवक, नागेश भोसले, लक्ष्मण शिरसट, पांडुरंग घंटी, गट नेते
सचिन डांगे, भिमा कारखान्याचे माजी संचालक राजू गावडे, सर्व नगरसेवक, भाऊसाहेब म्हमाने, धीरज म्हमाने, रवि भिंगे आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संखेने
उपस्थित होते.