समाजसेविका रत्नप्रभा पाटील यांच्या लढ्याला यश; नगरसेविका सौ. सुनंदा भाळवणकर यांचे नगरसेवकपद रद्द

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):- समता नगरमध्ये अनधिकृतरित्या भिंत बांधुन रहदारीचा प्रमुख मार्ग बंद करणार्‍या नगरसेविका सौ.सुनंदा भाळवणकर यांचे नगरसेवकपद जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी  नुकतेच रद्द केलेे. हा निकाल म्हणजे सदर प्रकरणाबाबत आवाज उठवणार्‍या समाजसेविका सौ. रत्नप्रभा पाटील यांच्या लढ्याला मिळालेले यशच म्हणावे लागेल.


याबाबतची सविस्तर माहिती अशी की, त्या काळी पंढरपूर शहरातील समता नगर येथील अनेक  नागरिक प्रचंड तणावाखाली होते. कारण रहदारीचा प्रमुख रस्ताच चक्क भिंत बांधुन अडवला गेला होता. यामुळे येथील स्थानिक रहिवाशांना मोठा वळसा घेत दुरवरुन प्रवास करावा लागत असे. हॉटेल अश्‍वमेघ च्या पाठीमागे पंढरपूरच्या नगरसेविका सौ.सुनंदा भाळवणकर व कुटूंबाची ‘रघुपुष्प’ ही इमारत आहे. याला लागुनच समता नगरकडे एक  रस्ता जातो मात्र सौ.भाळवणकर यांनी ही जागा आपल्याच मालकीची आहे म्हणत हा रस्ता भिंत बांधुन अडवला होता. समता नगरचे नागरिक वेगवेगळ्या मार्गाने याला विरोध करत होते मात्र ‘आपण ही भिंत कोणत्याच परिस्थितीत तोडू देणार नाही’ अशी भुमिका नगरसेविका सौ.भाळवणकर यांनी घेतल्याने या प्रकरणातील  पेच आणखीनच वाढला होता. मात्र समता नगर मध्येच वास्तव्यास असणार्‍या धडाडीच्या समाजसेविका रणरागिणी सौ.रत्नप्रभा चांगदेव पाटील  या येथील रहिवाशांच्या  पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. त्यांनी जाहिरच केले की, ‘‘ही भिंत कायद्याच्या आधारे हलगी लावुन पाडू’’ त्यांनी वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकार्‍यांना निवेदने देऊन आंदोलने करुन हे प्रकरण तडीस नेत सत्य स्थिती अधिकार्‍यांना पटवुन दिली. अखेर ही भिंत हायकोर्टाच्या आदेशाने दि. 17 मार्च 2013 रोजी पाडण्यात आली. नुकतेच याप्रकरणी नगरसेविका सौ. सुनंदा सुहास भाळवणकर यांना दोषी ठरवत डॅशिंग व कर्तव्यदक्ष प्रामाणिक जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी सौ.भाळवणकर यांचे नगरसेवक पद रद्द केले. जिल्हाधिकार्‍यांनी दिलेला हा निकाल म्हणजे समाजसेविका सौ. रत्नप्रभा पाटील यांच्या लढ्याला मिळालेले खरे ‘यश’ आहे.

सदर भिंत पाडावी आणि नागरिकांना योग्य न्याय द्यावा अशा आशयाची अनेक निवेदने त्यावेळी सौ.रत्नप्रभा पाटील यांनी तत्कालीन मुख्याधिकारी व जिल्हाधिकारी यांना दिले. मात्र त्यांची ही मागणी मान्य होत नव्हती. उलटपक्षी वेगवेगळ्या पध्दतीने त्यांच्यावर दबाव आणला जात होता मात्र सौ.पाटील यांनी न डगमगता तत्कालीन आयक्त प्रभाकर देशमुख यांच्याकडे धाव घेतली. या प्रकरणातील सत्य स्थिती त्यांना पटवुन दिली. आयुक्तांनी या बाबीची गंभीर दखल देत ही भिंत पाडण्याचे आदेश दिले. हा प्रवास सोपा नव्हता... मात्र सौ.रत्नप्रभा पाटील यांनी ही लढाई अखेरपर्यंत लढायची व नागरिकांना न्याय मिळवून द्यायचाच हा घेतलेला ठाम निर्धार आणि अथक प्रयत्न कामी आले.

हे यश माझे नाही हे यश आहे जनतेचे - रत्नप्रभा पाटील

याबाबत सौ.रत्नप्रभा पाटील  यांना विचारले असता त्या म्हणाल्या की, ‘‘नगसेविका सौ. भाळवणकर यांनी समता नगर भागातील प्रमुख रहदारीचा रस्ता भिंत बांधुन बंद केला ही बाबच लोकसेवकाला न शोभणारी होती.  स्थानिक नागरिकांची यामुळे होणारी गैरसोय बघवत नव्हती. आणि अन्याय सहन करणे माझ्या स्वभावात बसणारे नव्हते. त्यामुळे मी कायदेशीर मार्गाने स्थानिक रहिवाशांना सोबत घेवून लढा दिला. अखेर हायकोर्टाच्या आदेशाने दि. 17  मार्च 2013 रोजी ही भिंत पाडण्यात आली. मात्र नगरसेविका सौ.भाळवणकरांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करत नागरिकांना वेठीस धरण्याचा केलेला प्रकार अयोग्यच होता. जिल्हाधिकार्‍यांनी नुकताच त्यांच्या नगरसेवक पद रद्द करणेबाबतचा निकाल अभिनंदनीय असाच आहे. अनेकवेळा राजकीय मंडळी आपल्या हाती  सत्ता आल्यानंतर आपण आता जनतेचे सेवक नसून ‘मालक’ झालो अशा अविर्भावात वागत असतात. आणि सत्तेची धुंदी चढल्यानंतर शासकीय मालमत्ता सुध्दा माझीच आहे, माझ्याकडे सत्ता आहे... कोण काय करणार? असा गैरसमज करुन घेत सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे आणि जनतेला मुर्ख बनविण्याचे उद्योग करतात. मात्र जनता जेंव्हा अन्यायाविरोधात आवाज उठवते तेंव्हा अशा आपमतलबी राजकारण्यांना त्यांची जागा दाखविलीच जाते. कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी या निकालातून हेच सिध्द केलेले आहे.’’ आणि हे यश माझे एकटीचे नसून माझ्या भागातील या लढ्यात सहभागी झालेल्या सर्व नागरिकांचे असल्याची प्रांजळ कबुलीही त्यांनी दिली.

***********************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 4 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 79 हजार 845 हजाराहून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 388 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399