शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले रायगडावर 335 व्या शिवपुण्यतिथीनिमित्त शिवछत्रपतींना ढोलताशाच्या निनादात मानाचा मुजरा

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):-

  पंढरपूर येथील शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले रायगडावर  335 व्या  शिवपुण्यतिथी निमित्त ढोलताशाच्या निनादात शिवछत्रपतींना मानाचा मुजरा केला. पंढरपूर परिसरातु सुमारे 400 हुन अधिक शिवभक्त प्रतिष्ठानच्या वतीने किल्ले रायगडावर ‘‘ श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड ’’ यांच्या पुढाकाराने सालाबादप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहात शिवपुण्यतिथी साजरी करण्यात आली.सोलापूर जिल्ह्यातून पंढरपूरमधील शिवभक्त प्रतिष्ठान गेली 42 वर्षे किल्ले रायगडावर शिवसमाधीची पुजा करण्यासाठी जात आहे 



किल्ले रायगडावर पुण्यतिथी सोहळ्यादिवशी ढोल,ताशे, हालग्या, संबळ यांच्या निनादात सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. त्याचबरोबर पंढरीची वारकरी संताची पंरपरा असलेली बालचमुंची दिंडीही सामील झाली होती. मावळ्यांच्या रूपात अबदागीरी व झेंडे घेऊन असंख्य शिवभक्त सामील झाले होते. ही भव्य मिरवणूक शिरकाई देवी मंदिर, श्री जगदीश्‍वर मंदिर, शिवसमाधी येथे पोहचली. भव्य दिव्य निघालेली मिरवणूक पाहून आलेले सर्व शिवभक्त आवाक झाले होते. अनेकजन आपल्या कॅमेर्‍यामध्ये व मोबाईलमध्ये एैतिहासिक मिरवणुकीचे चित्र टिपताना दिसत होते. ध्येमंत्र आणि प्रेरणामंत्राने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधीची विधिवत पुजा करण्यात आली. यावेळी आलेल्या असंख्य शिवभक्तांनी दिलेल्या ललकारी व गर्जनेमुळे रायगड परिसर दणाणून गेला.तोङ्गांची सलामी दिल्यानंतर ही मिरवणूक पुन्हा राज दरबाराकडे निघाली. श्री जगदेश्‍वर मंदिराच्या आवारामध्ये व्यसनमुक्तीची शपथ व गड स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबविण्यात आला. ही मिरवणूक बाजारपेठ मार्गे राजदरबारातील मेघडंबरीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पुजन व महाआरती करण्यात आली. यानंतर होळीच्या माळावरील  शिवछत्रपतीच्या मूर्तीचे पुजन करून मिरवणूकीची सांगता करण्यात आली.
 ‘‘ श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ स्थानिक उत्सव समिती महाड’’ च्या वतीने दिला जानारा ‘‘ रागड भुषण पुरस्कार’’ सहावा श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार ‘‘ दुर्गप्रेमी श्री तुकाराम वि. जाधव (मुंबई) यांना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मा.ना. श्री.देवेंद्रजी ङ्गडणवीस यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.या वेळी रायगड जिल्ह्याचे पालक तथा गृहनिर्माण,कामगार मंत्री. प्रकाशजी मेहता व सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम मंत्री. मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील या कार्यक्रमास उपस्थीत होते.तसेच रायगड पुरस्कार ‘‘ दुर्गप्रेमी श्री तुकाराम वि. जाधव (मुंबई)    यांचा शिवभक्त प्रतिष्ठानच्यावतीने सत्कार करण्यात आला. सोहळा यशस्वी करण्यासाठी शिवभक्त प्रतिष्ठानचे पदाधिकारी व कार्यकत्यांनी परिश्रम घेतले.

**********************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 4 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 79 हजार 845 हजाराहून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 388 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399