पंढरपूर लाईव्ह चा स्पेशल रिपोर्ट व्हिडीओ बघा... पंढरपूरमधील नागालॅन्ड चौकातून नागरिक जीव मुठीत धरुन करतात प्रवास...

पंढरपूर लाईव्ह चा स्पेशल रिपोर्ट
व्हिडीओ बघा...
पंढरपूरमधील नागालॅन्ड चौकातून नागरिक जीव मुठीत धरुन करतात प्रवास...

पंढरपूर लाईव्ह:- उपनगरातील रहिवाशांसाठी हा खुप मोठा प्रश्‍न बनलेला असून या मार्गाचे दुहेरीकरण व्हावे, येथे डिव्हायडर व्हावेत आणि या मार्गावर गतीरोधक किंवा झेब्रा क्रॉसिंग व्हावे आदी नागरिकांच्या मागण्या आहेत. पंढरपूर लाईव्ह च्या कॅमेर्‍यासमोर कांही जबाबदार नागरिकांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. जेष्ठ नागरीक श्री.आण्णा ऐतवाडकर (सर), खादी ग्रामोद्योगचे सदस्य गणेश सिंघण व या मार्गावरील व्यावसायीक इक्बाल मन्नूर आदींनी दिलेल्या प्रतिक्रया चा खालील व्हिडीओ.


प्रज्ञा प्राथमिक विद्यालय, इंग्लिश मिडीयम स्कुल, कवठेकर प्रशाला, राजाराम इंगिलश मिडीयम स्कुल, यशकिर्ती विद्यालय, मॉडर्न एज्यूकेशन स्कुल, रत्नप्रभादेवी मोहिते-पाटील विद्यालय, उमा महाविद्यालय, के.बी.पी. महाविद्यालय, सिंहगड इनस्टिट्युट, न्युसातारा संकुल, कर्मयोगी अभियांत्रीकी महाविद्यालय शेळवे,  आदी शैक्षणिक संस्थाकडे जाण्यासाठी लिंक रोडवरुन मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांचा राबता असतो. अनेक लहान मुलांना माता-भगिणी शाळेत सोडताना हा रस्ता जीव मुठीत धरुन क्रॉस करतात. अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी सायकलवरुन जा-ये करत असतात, अनेक वृध्द मंडळी सुध्दा हा रस्ता ओलांडताना चाचरत असतात याला कारण एकच आहे ते म्हणजे ‘‘येथे स्पीड ब्रेकर्स नाही.’’
व्ही.आय.पी. मार्गाचे कारण सांगत येथे स्पीड ब्रेकरच केले जात नाहीत. मात्र विशेषत: हॉटेल नागालॅन्ड, देशमुख पेट्रोल पंप, डाक बंगला, हॉटेल अश्‍वमेघ आदी पॉईंट वरुन रोड क्रॉसींग डेंजरस् होऊन बसलेलं आहे. यामुळे किमान या कांही ठिकाणी तरी स्पीड ब्रेकर्स किंवा किमान झेब्रा क्रॉसिंग तरी असावेत ही गेल्या कित्येक वर्षापासूनची उपनगरवासीयांची मागणी दुर्लक्षीत आहे. 

 

व्हीआयपी मार्ग छळतोय सामान्य पंढरपूरकरांना..!

व्हीआयपी मार्ग म्हणून स्पीड ब्रेकर्स नाहीत असे म्हटले जाते मात्र यामुळे पंढरपूरातील या मार्गावरुन दररोज प्रवास करणारे स्थानिक रहिवाशी त्रस्त आहेत. ‘‘हा रस्ता क्रॉस करुन ज्यांची मुले शाळेत किंवा ट्युशनसाठी जातात ती मुले घरी सुखरुप येईपर्यंत नागरिकंाच्या जीवात जीव नसतो.’’ कांही ठिकाणी स्पीड ब्रेकर्स किंवा किमान झेब्रा क्रॉसिंग तरी असावेत ही गेल्या कित्येक वर्षापासूनची उपनगरवासीयांची मागणी दुर्लक्षीत आहे.  स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक व जबाबदार अधिकार्‍यांनी याकडे लक्ष देवून वरील प्रश्‍न त्वरीत सोडवावा अशी मागणी उपनगरीय रहिवाशांकडून  होत आहे.

****



पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 27 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 87 हजार 218 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 400 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399