नेत्रदान-देहदान चळवळ तळागाळापर्यंत जाणे ही काळाची गरज आहे-प्रशांत परिचारक

पंढरपूर लाईव्ह- : प्रतिनिधी  ज्याप्रमाणे रक्तदान चळवळ तळागाळापर्यंत गेली आहे.  त्याप्रमाणेच नेत्रदान-देहदान चळवळ तळागाळापर्यंत जाणे ही  काळाची गरज आहे असे मत पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी व्यक्त केले.

पंढरपूर अर्बन बँकेच्या सभागृहात महर्षी दधीची नेत्रदान-देहदान मंडळावतीने आयोजित केलेल्या नेत्रदान व
देहदान संकल्प ङ्गॉर्म व ओळखपत्र वाटप कार्यक्रमात परिचारक बोलत होते. यावेळी नेत्रतज्ञ डॉ. मिलिंद लोटके, डॉ. अशोक दोशी, डॉ. शितल पाटील, डॉ.  सौ. संगीता पाटील, माजी नगराध्यक्ष सतीश मुळे, माजी नगरसेवक सचिन कुलकर्णी, राजेंद्र केसकर, अ‍ॅड. विलास साळुंखे, महर्षी दधीची नेत्रदान-देहदान मंडळाचे अध्यक्ष सुरेश दर्शने आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रशांत परिचारक म्हणाले की, आपले डोळे अतिशय अमुल्य आहे. त्याच्यातील बुबुळाचा 
मृत्युनंतरसुध्दा बुबुळाच्या विकाराने अंध असणार्‍या दोन जणांना दृष्टी देण्यासाठी उपयोग होतो. भारतात
नेत्रदानाचे प्रमाण कमी आहे. ते वाढविणे काळाची गरज आहे. समाजात वाईट गोष्टींना त्वरीत प्रसिध्दी मिळते मात्र चांगल्या संस्थांच्या कार्यांना म्हणावी तशी प्रसिध्दी मिळत  नाही. समाज धुरीनांनी अशा संस्था टिकण्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे.  प्रास्ताविक भाषणात अध्यक्ष सुरेश दर्शने म्हणाले की,  नेत्रदान-देहदानाची चळवळ पंढरपूरात सुरूवात करून चार वर्षे पुर्ण झाली आहेत. या कालावधीत पंढरपूर, सांगोला,  मंगळवेढा, माढा या तालुक्यातून या चळवळीस भरपूर प्रतिसाद  मिळालेला आहे. आजअखेर 7 देहदान व 4 नेत्रदान झालेले असून 150 जणांनी नेत्रदान-देहदानाचे संकल्प ङ्गॉर्म  भरलेले आहेत. चळवळ पुढे नेण्यासाठी व प्रचार व प्रसारासाठी आर्थिक मदतीची व लोकसहभागाची गरज  आहे.

यावेळी बोलताना डॉ. मिलिंद लोटके म्हणाले की,  श्रीलंकेप्रमाणे भारतातही अवयव दानाबद्दल कायदा व्हावा असे  सांगून भारत हा देश शेतीप्रदान असल्यामुळे कष्टकरी  शेतकर्‍यांना शेतात काम करत असनाना डोळ्यास इजा होवून बुबुळाचे विकार होतात. यामुळे अंधत्व येते.  नेत्रदान सर्वजण करू शकतात परंतु ङ्गक्त कावीळ, कॅन्सर, एड्स अशा व्यक्तीसोडू सर्व लोक नेत्रदान करू शकतात. मृत्युनंतर 4 तासाच्या आत नेत्रदान करावे. तशी सुचना संबंधीत नेत्रतज्ञांना द्यावी. देहदानाचा उपयोग एम. बी. बी. एस. च्या मुलांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी होतो.  

यावेळी प्रशांत परिचारक यांच्या हस्ते सौ. लक्ष्मी कुरूलकर, अशोक कोर्टीकर, सौ. सुरेखा मोहिकर,
डॉ. संगीता पाटील, डॉ. शितल पाटील, मिनाक्षी माळवदकर, शिवाजी बाबर आदींना नेत्रदानाचे ओखळपत्र देण्यात आले.

यानंतर शुभमंगल मॅरेजब्युरोच्या एप्रिल 2015 अंकाचे व वेबसाईटचे उद्घाटन परिचारक यांच्या हस्ते करण्यात
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीराम गणपुले, वसंतराव कुलकर्णी, सौ. दिपा दर्शने, विद्य मिरजकर आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेंद्र कवडे यांनी केले. आभार वसंतराव कुलकर्णी यांनी मानले.
******

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 24 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 86 हजार 139 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 260 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399