भैरवनाथ वाडी येथील यात्रेची उत्साहात सुरूवात

पंढरपूर (प्रतिनिधी) ः - पंढरपूर तालुक्यातील भैरवनाथवाडी येथील भैरवनाथाची यात्रेची उत्साहात सुरूवात झाली असून, या यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याचे भव्यदिव्य आयोजन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे. या पालखी सोहळ्याचे उदघाटन पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांच्या हस्ते करण्यात आले.


यावेळी नारायण चिंचोलीचे सरपंच लक्ष्मणराव धनवडे, अशोकदादा डोंबे, महावीर देशमुख, सोमनाथ लोहार, माजी सरपंच धमेंद्र नलवडे, लक्ष्मण कोले, सोसायटीचे व्हा.चेअरमन विष्णू माने, सदगुरू मेटकरी, लहू शिंगटे, नितीन मस्के, ग्रा.पं.सदस्य बाळू बनसोडे, विजय कोळेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावेळी भैरवनाथाच्या पालखीचे भव्यदिव्य गावातील मुख्य रस्त्यावरून मिरवणूक काढण्यात आली. ही यात्रा यशस्वी पार पाडण्यासाठी भाऊसाहेब माने, डॉ.सरडे, गणेश कोळेकर, बप्पा धनवडे, भागवत सोनवर, अनिल गाजरे, अभिजीत कवडे, विठ्ठल माने, महादेव डुबल, प्रकाश जाडकर, राहूल कांबळे, भानुदास गाजरे, धर्मराज हजारे, विष्णू हजारे, बाळू सुतार, प्रकाश शिंगटे, पोलीस कॉन्स्टेबल कर्चे आदींसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

फोटो ः भैरवनाथवाडी येथील पालखी सोहळ्याचे उदघाटन करताना पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सरपंच लक्ष्मणराव धनवडे, अशोक, डोंबे, महावीर देशमुख आदी (छाया ः नितीन घाडगे)

**********************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 24 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 86 हजार 139 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 260 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399