सरकारी वकील व अभियोक्ता पदाबाबत आवाहन

पंढरपूर लाईव्ह

सोलापूर दि. 13 : महाराष्ट्र विधी अधिनियम 1984 च्या नियम (1) च्या खंड (क) मध्ये दुरुस्ती करण्यात आली असून या दुरुस्तीनुसार सद्यस्थितीत जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता तसेच सर्व सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा 5 वर्षापर्यंत शिथिल करण्यात आली आहे.

त्यामूळे सद्या कार्यरत असलेले जे विधी अधिकारी नियुक्तीच्या दिनांकास 60  वर्षाहून अधिक वयाचे नसतील ते जिल्हा सरकारी वकील व सरकारी अभियोक्ता तसेच सर्व सहायक सरकारी वकील व अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पदावरील नियुक्तीसाठी दिनांक 15 एप्रिल पर्यंत अर्ज दाखल करु शकतील म्हणजेच वरिल सर्व पदासाठी येत्या बुधवार दि. 15 एप्रिल 2015 पर्यंत संबंधितांनी अर्ज सादर करावेत असे  आवाहन जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांनी एका पत्रकान्वये केले आहे.

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 14 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 84 हजार 431हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 8 हजार 11  झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399