दोन लाखांहून अधिक भाविकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण केली

पंढरपूर लाईव्ह

पंढरपूर-दि.31:- चैत्री यात्रेसाठी पंढरीत दाखल झालेल्या सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांनी चंद्रभागेत स्नान करून विठुनामाच्या गजरात विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेऊन नगर प्रदक्षिणा पूर्ण केली.


चैत्री एकादशीला दर्शन व्हावे यासाठी भाविक काल रात्रीपासूनच दर्शन रांगेत उभे होते. कामदा एकादशीचा नियम पूर्ण करण्यासाठी काही भाविकांनी चंद्रभागा स्नान, नामदेव पायरीचे व कळस दर्शन घेऊन नगरप्रदक्षिणा पूर्ण केली. टाळ, मृदंगाच्या गजरात अभंग गात, ग्यानबा-तुकारामाच्या नामघोषात नगरप्रदक्षिणा पूर्ण करण्यात वारकरी दंग होते. चौफाळा, महाद्वार घाट हा परिसर भाविकांनी फुलून गेला होता.

चैत्रीची यात्रा धावती यात्रा असल्याने दर्शन घेऊन भाविक शिखर शिंगणापूरच्या महादेवाच्या दर्शनाकडे जातात. या यात्रेस बीड, लातूर, नांदेड, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा यासह राज्यातील अन्य भागातील भाविक पंढरीत दाखल झाले या वारीसाठी मंदीर समिती, नगर पालिका प्रशासनाकडून वारक-यांसाठी पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालय, आरोग्य सुविधा आदींची सोय करण्यात आली होती.

**********

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 1 एप्रिल  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   79 हजार 137 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 287 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.