हरिनाम सप्ताहाचा हिशोब विचारला म्हणून सरपंचासह चौघांनी केला एका अबलेवर अत्याचार..

पंढरपूर लाईव्ह

31 मार्च : अहमदनगर जिल्ह्यात एक घटना घडली... माणुसकीला काळीमा फासणारी... अखंड हरिनाम सप्ताहाच्या पैशाचा हिशोब का मागितला म्हणून एका असहाय्य अबला  महिलेवर  गावातीलच सरपंचासह चौघांनी केला सामुहिक बलात्कार... ही घटना महाराष्ट्रासह संपुर्ण मानवजातीला काळीमा फासणारी अशीच म्हणावी लागेल...

अहमदनगर जिल्ह्यातल्या  सोनई गावात ही दुर्दैवी घटना घडली.... यावेळी एका महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. अखंड हरिनाम सप्ताहाच्या पैशांचा हिशोब विचारला म्हणून गावातल्या माजी सरपंचासह चौघांनी या महिलेवर बलात्कार केला. सोनईतल्या राजेगाव परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. या घटनेने संपूर्ण नगर जिल्हा हादरून गेला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नगर शहराजवळील राजेगावच्या तारकेश्वर गडावर आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहासाठी 30 लाख रुपयांची वर्गणी जमा करण्यात आली होती. पीडित महिलेच्या पतीने भाजपचा माजी सरपंच लक्ष्मण घुले याला या वर्गणीचा हिशोब मागितला होता. त्यामुळे चिडलेल्या घुलेने त्याच्या चार साथीदारांनी रविवारी रात्री पीडित महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली. त्यानंतर पुन्हा दुसर्‍या दिवशी या सर्वांनी त्यांच्या घरात घुसून पीडित महिलेच्या 21 वर्षीय मुलालाही मारहाण करून त्याला बांधून ठेवले. त्यानंतर सरपंचासह त्याच्या अन्य तीन साथीदारांनी पीडित महिलेवर सामूहिक बलात्कार केला. यासंदर्भात महिलेने पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सरंपचासह त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सरपंचाच्या अल्पवयीन मुलीच्या लग्नाला पीडित महिलेल्या कुटुंबियांनी विरोध केला होता. गावातल्या अनेक सामाजिक कार्यक्रमात या महिलेचा पुढाकार असायचा. त्याचाही राग सरपंचाच्या मनात होता. या रागातूनच सूड उगविण्यासाठी हे अमानूष कृत्य केल्याचे पीडित महिलेने पोलिसांना सांगितले आहे. यावरुन एकच सिध्द होते की आजही एखादी महिला अन्यायाविरुध्द आपला आवाज उठविण्याचा प्रयत्न करत असेल तर समाजाचे ठेकेदार हा आवाज दाबण्यासाठी वाट्टेल त्याथरावर जातात... कट्टर कायदे करुनही महिलांवर होणारे असे अत्याचार थांबत नाहीत हे पाहून कोणत्याही सजग माणसाचे मन विषण्ण व्हावे अशा या घटना कधी थांबतील? असा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडत आहे.

***********

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 31 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   78 हजार 839 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 249 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.