पंढरीत महावीर जयंती निमित्त 40 जणांचा मरणोत्तर देहदान संकल्प

मरणोत्तर नेत्रदान देहदान करण्याचा संकल्प

पंढरपूर लाईव्ह  (प्रतिनिधी):-

 युनिक क्रांती महिला मंडळाच्यावतीने महावीर  जयंतीचे औचित्य साधून राजपूत मंगल कार्यालयात मरणोत्तर नेत्रदान व देहदान संकल्प फॉर्म भरण्यासाठी शिबीर आयोजित केले होते. प्रारंगी महर्षी दधिची नेत्रदान  देहदान मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण दर्शने यांनी नेत्रदान व  देहदानाविषयी माहिती सांगून सर्वांना नेत्रदान व देहदान  संकल्प फॉर्म भरण्यासाठी आवाहन केले. आपण केलेल्या मरणोत्तर नेत्रदानामुळे आपल्या मृत्युनंतर बुबुळाच्या विकाराने अंध आहेत. अशा दोन व्यक्तींना दृष्टी मिळते. 

नेत्रदान हे महान दान आहे. यावेळी जैन समाजातील लोकांनी मोठ्या संख्येने फॉर्म घेवून नेत्रदान व  देहदानाचे 40 संकल्प ङ्गॉर्म भरून सादर केले. यावेळी सौ. दिपा शहा अध्यक्षा व अनघा शहा यांनी सदरचे ङ्गॉर्म लक्ष्मण  दर्शन यांना सुपुर्द केले. यावेळी मंडळाच्या अध्यक्षा सौ. दिपा शहा, अनघा शहा, सारीका बोलडिया, तेजा शहा,  गुरसाळकर, अ‍ॅड. प्रङ्गुल्ल शहा, महावीर खडके, बाळासाहेब  झरकर आणि महावीर युवा सेनेचे प्रमुख निखिल शहा आदी  उपस्थित होते. कार्यक्रमात जैन  सोशाल ग्रुपचे  मरवडेकर यांनी नेत्रदान संकल्पासाठी शिबीर आयोजित करणार असल्याचे जाहीर केले. या कार्यक्रमास नेत्रतज्ञ  डॉ. मिलिंद लोटके, डॉ. अशोक दोशी यांनी   मार्गदर्शन केले. महर्षी दधिची नेत्रदान देहदान  मंडळाच्यावतीने प्रा. अभिजीत अवताडे यांनी युनिक  क्रांती महिला मंडळ व महावीर युवा सेना यांचे  सहकार्याबद्दल आभार मानले.

**********************************

पंढरपूर लाईव्ह वाचकसंख्या 1 लाखाकडे झेपावतेय..!

अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप लवकरच 10 हजार मोबाईलमध्ये जाणार...!

आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे. ‘पंढरपूर लाईव्ह’ हे पंढरपूरमधील सर्वप्रथम ई-न्यूज वेब पोर्टल जास्तीत जास्त नेटीझन्स् पर्यंत पोहचविण्यात आणि याचे वेगळेपण जपण्यात ‘पंढरपूर लाईव्ह’ ची सर्व टीम यशस्वी झालेली आहे.
आज दि. 5 एप्रिल 2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल च्या वाचकांची संख्या 80 हजार 355 हून अधिक झालेली असून लवकरच या वेब पोर्टलचे वाचक लाखाच्या घरात सहज पोहचतील याबाबत शंका नाही. पंढरपूर लाईव्ह चे अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या
मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या आज घडीला 7 हजार 452 झालेली असून लवकरच 10 हजार मोबाईलधारकांच्या मोबाईलमध्ये हे अ‍ॅप सहज पोहोचेल अशी अपेक्षा आहे.
‘पंढरपूर लाईव्ह’ ला दिलेल्या उत्सफुर्त प्रतिसादाबद्दल सर्वांचे मन:पूर्वक आभार..!
पंढरपूर लाईव्ह च्या अ‍ॅप मध्ये अथवा वेब पोर्टलमध्ये आपणास कांही बदल हवे असतील तर अवश्य सुचवावेत.

आपले लेख-साहित्य-बातम्या-जाहिराती अवश्य पाठवा..!

आमचे ई-मेल आयडी    jhanjavat@gmail.com     livepandharpur@gmail.com
मुख्य संपादक:- भगवान गणपतराव वानखेडे

मोबाईल क्रमांक  8308838111 / 8552823399