कै.देवाप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ भव्य जंगी कुस्ती मैदान

पंढरपूर लाईव्ह:-

 जेष्ठ समाजसेवक व कोळी समाजाचे माजी अध्यक्ष कै.देवाप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ श्री समस्त बाराभाई तालीम यांच्यावतीने गुरूवार दि.26 मार्च 2015 रोजी येथील टिळक स्मारक मैदानाच्या भव्य प्रांगणात भव्य जंगी कुस्ती मैदान संपन्न झाले.प्रथम क्रमांकाची रुपये 1 लाख पारितोषीकाची कुस्ती पै.संतोष दोरवड व पै.अमोल फरतडे यांच्यात तर द्वितीय क्रमांकाची 51 हजार पारितोषीकाची कुस्ती पै.सुनिल शेवतकर व संतोष लवटे यांच्यात झाली.तर तर तृतीय क्रमांकाची लढत पै.विष्णुपती दिड्डी व पै.महेश शिंदे यांच्यात झाली.

 आयपीएस अधिकारी श्रीकांत पवार यांच्या हस्ते या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. 


यावेळी श्रीकांत पवार यांनी बाराभाई तालीम मंडळाच्या वतीने आयोजीत केलेल्या या कार्यक्रमाचे कौतुक करुन मल्लविद्येला प्रोत्साहन देण्यासाठी सामुहिक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे सांगीतले.या कार्यक्रमास पंढरपूर तालुका पोलीस निरिक्षक दयानंद गावडे,शहर पोलीस निरिक्षक किशोर नावंदे,केंद्रिय वुलन अ‍ॅडवायजरी कमेटीचे माजी व्हा.चेअरमन संतोष नेहतराव,माजी नगराध्यक्ष लक्ष्मण शिरसट,नगरसेवक बाळासाहेब नेहतराव,मंदीर समितीचे सदस्य जयंत भंडारे,सुरेश शिंदे(गामा पैलवान),राजाभाऊ कांबळे,पै.अस्लम काझी,सत्यविजय मोहोळकर,नगरसेवक सचिन डांगे,उमेश संगीतराव,नेताजी अभंगराव,धनंजय कोताळकर,नगरसेवक नामदेव भुईटे,भाऊसाहेब जगताप,गणेश वाळके,दत्तात्रय धोत्रे,महेंद्र मेटकरी,गजानन भिंगे,अनिल जाधव,पै.राजाभाऊ भिंगे,पै.नलेश शिंदे,जितेंद्र म्हमाणे,राहुल म्हमाने,पै.सुभाष शिंदे-नाईक,माणिक कोताळकर,बापु नाईकवाडी,गणेश कोळी,वैभव जोशी,संजय बारसकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

 या कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषीक कोल्हापूर येथील पै अमोल फरतडे याने तर द्वितीय पारितोषीक पै.सुनिल शेवतकर,तृतीय पारितोषीक महेश शिंदे यांनी पटकावले.यावेळी पंच म्हणुन पै.भिमराव माळी,पै.रामभाऊ औसेकर,अस्लम काजी,पै.सोमनाथ सुर्वे,पै.बाळासाहेब चवरे,विलास तवरे,पांडुरंग जुमाळे,पांडुरंग लोंढे,अर्जुन शिंदे,अनिल कोंडकर,दिपक चव्हाण,महादेव चव्हाण,अमित पाटोळे यांनी काम पाहीले,निवेदन राजाभाऊ देवकते यांनी केले.ही कुस्ती स्पर्धा संपन्न करण्यासाठी श्री समस्त बाराभाई तालीम मंडळाचे सर्व मल्ल,कार्यकर्ते,मार्गदर्शक यंानी परिश्रम घेतले.

फोटो ओळ:- 1) कै.देवाप्पा कांबळे यांच्या स्मरणार्थ आयोजीत कुस्ती स्पर्धेतील एक क्षण. 

2) कै.देवाप्पा कांबळे यांच्या पुण्यस्मरणार्थ पंढरीत आयोजीत केलेल्या कुस्ती स्पर्धेचे उदघाटन करताना आय.पी.एस.अधिकारी श्रीकांत पवार,संतोष नेहतराव,दत्तात्रय कांबळे(पंत),तात्यासाहेब कांबळे,गणेश वाळके,देविदास कांबळे,प्रसाद कांबळे आदी.


***************  

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

































































































































































































































































































































































































































































































































मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

































ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com









































 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.27 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   77 हजार 979 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 128 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.