पंढरपूर तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

पंढरपूर लाईव्ह:-

पंढरपूर-दि.27:- तालुक्यातील 94 ग्रामपंचायतींच्या सन 2015-20 या वर्षाच्या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण आज पंचायत समिती सभागृह पंढरपूर येथे जाहीर करण्यात आले. तालुक्यातील एकूण 94 ग्रामपंचायती पैकी पोहोरगांव ग्रा.पं चे सरपंच पद अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव तर भटुंबरे ग्रा.पं. अनुसूचित जमातीच्या मेदवारासाठी आरक्षण पडले आहे. 

 ग्रा.पं. पांढरेवाडी, खेडभोसे, अजोती, शेळवे, केसकरवाडी, जैनवाडी, रांझणी, एकलासपुर, तनाळी या ग्रा.पं. अनुसूचित जातीच्या सरपंच  पदाच्या उमेदवारांसाठी राखीव आहेत. तसेच उजनी, वाडीकुरोली, खरातवाडी, जाधववाडी, देवडे, चिलाईवाडी, खेडभाळवणी, लोणारवाडी, ‍ शिरगांव, मगरवाडी या ग्रा.पं. अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहेत. नागरीकांचा मागास प्रवर्गासाठी जळोली, सुगांवखुर्द, कौठाळी, देगांव, कासेगांव, खर्डी, तारापूर, आंबे, ओझेवाडी, पेहे, गादेगांव, उंबरे  या ग्रा.पं सरपंच पदासाठी राखीव आहेत.तर कान्हापुरी, पट.कुरोली, भंडीशेगांव, वाखरी,  टाकळी, अजनसोंड, अनवली, फुलचिंचोली, गुरसाळे-वेणुनगर, पळशी, खरसोळी, चळे, पुळूज  या तेरा ग्रा.पं ती मध्ये नागरीकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव राहणार आहे.

सर्वसाधारण महिला सरपंच राखीव म्हणून ग्रा.पं. बार्डी, सोनके, आढीव, करोळे ,  सांगवी-बादलकोट, नांदोरे, भोसे, सुगाव भोसे, मेंढापूर, धोंडेवाडी, भाळवणी, उपरी, कोर्टी,  बोहाळी, बाभुळगांव, बिटरगांव, ईश्वरवठार, मुंढेवाडी, गोपाळपूर, तावशी, विटे, आंबे  चिंचोली, सरकोली या ग्रा.पं.आहेत. तर उर्वरित ग्रा.पं. खुल्या  प्रवर्गासाठी आरक्षित  झाल्या आहेत. यामध्ये नेमतवाडी, आव्हे-तरटगाव, पिराची कुरोली, करकंब, शेवते, होळे,  टाकळी गुरसाळे, शेंडगेवाडी, सुपली, गार्डी, तिसंगी, शिरढोण, उंबरगांव, रोपळे, तुंगत,  शेगांवदुमाला, सुस्ते, सिध्देवाडी-तरटगांव-चिचूंबे, शेटफळ, पुळूजवाडी, शंकरगांव-नळी,  नेपतगांव, चिंचोली भोसे, नारायण चिंचोली, कोंढारकी या ग्रामपंचायतींचा समावेश  असल्याची माहिती तहसिलदार गजानन गुरव यांनी दिली. यावेळी गटविकास अधिकारी  ज्ञानप्रकाश घुगे, नायब तहसिलदार मारुतराव मोरे तसेच तालुक्यातील विविध गावचे  सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित‍ होते.
****************
  


****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

































































































































































































































































































































































































































































































































मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

































ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com









































 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.27 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   77 हजार 979 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 128 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.