पंढरपूरमध्ये प्रदिप पांढरे सरांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त सत्कार समारंभ संपन्न

पंढरपूर लाईव्ह:-

पंढरपूर (वार्ताहर) दि.26- निरपेक्ष आणि विशुध्द प्रेम ही जीवनाला श्रीमंत आणि समृध्द करणारी एक अलौकीक अशी ईश्‍वरी भेट आहे. म्हणून रुपसौंदर्यावरील  प्रेम, नात्यावरील प्रेम, घरसंसारावरील प्रे्रम, अन्नावरचे प्रेम आणि धनावरचे प्रेम यामुळे आपल्या जीवनाला चारुत्व आणि चैतन्य प्राप्त होत असले तरी ते माणसाला गुलाम बनविते. या प्रेमाबरोबरच माणसाजवळ शब्दप्रेम, साहित्यप्र्रेम, रंगावरील प्रेम, कलेवरील प्रेम असेल तर माणुस व्यापक होतो. शब्द, साहित्य, रंग आणि मुल्यावरील प्रेमाबरोबरच माणसावरील आणि माणुसकीवरील प्रेम ही पांढरे सरांची खरी संपत्ती आहे असे प्रतिपादन जेष्ठ ग्रामीण साहित्यीक प्रा.डॉ.द.ता.भोसले यांनी केले.


प्रदिप पांढरे सरांच्या सुवर्णमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमात
पुढे बोलताना डॉ.द.ता.भोसले म्हणाले की, प्रदीप पांढरे सरांच्या बोटात चित्रकला आहे, ओठात गीत आहे आणि पावलात जीवनाचे संगीत आहे आणि या सार्‍याला त्यांच्या जवळच्या माणुसकीने कवेत घेतले आहे. अवतीभोवतीचा अवघा समाज चित्रासारखा सजीव व्हावा, संगीतासारखा सुरेल व्हावा या त्यांच्या ध्यासाची ही 50 वर्षे ‘सुवर्ण’ मय झालेली आहेत. ती आता नक्कीच ‘अमृत’मय होतील यात शंका नाही.
सा.ज्ञानार्पण मधुन लेखन करत होते. समाजाच्या सुख-दु:खाशी एकरुप होणारे व मैत्री जपणारे असे निखळ व्यक्तीमत्व प्रत्येकाला हवे-हवेसे  वाटणारे आहे. दुसर्‍याच्या मदतीला जाणे हे सरांच्या व्यक्तीमत्वाचा पैलु आाहे. त्यामुळे अशा शिक्षकांची समाजाला खर्‍या अर्थाने गरज आहे असे विचार त्यांनी मांडले. यावेळी इतर मान्यवरांनीही आपले विचार व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. यावेळी लातुरहून आलेले सरांचे बंधु दिलीप पांढरे (सर) व त्यांचा मित्रपरिवार यांचे वतीने प्रदीप पांढरे सरांचा सन्मानपत्र व विठ्ठल प्रतिमा देवून  सत्कार करण्यात आला.  तसेच डॉ.प्रा.द.ता.भोसले यांचे वतीने पांढरे सरांना विशेष मानपत्र देण्यात आले.
अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रा.डॉ.वामन जाधव, श्री.ना.बा.रत्नपारखी, श्री.सिध्दार्थ ढवळे (सर), प्रा.चांगदेव कांबळे, प्रा.शशिकांत जाधव (मंगळवेढा), साईरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका सौ.रत्नप्रभा पाटील, सत्कारमुर्ती प्रदिप पांढरे आदी उपस्थित होते.
प्रमुख पाहुणे प्रा.डॉ.वामन जाधव म्हणाले की, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सामाजिकता या लोकशाही मुल्यावर संपादक म्हणून प्रदिप पांढरे  यांची अपार निष्ठा आहे. समाजातील अनेक प्रश्‍नावर ते खुप तळमळीने 
कार्यक्रमाची सुरुवात कवि संमेलनाचे झाली. या संमेलनाचे अध्यक्षपदी शब्दकला साहित्य संघ मंगळवेढा संघाचे अध्यक्ष प्रा.शशिकांत जाधव हे होते. या संमेलनात कवी दादासाहेब खरात, रा.म.साठे, प्रा.उबाळे (सर), सौ.श्‍लेषा कारंडे, मोहन शिंदे  यांनी आपल्या कविता सादर करुन कार्यक्रमाची रंगत वाढविली.
चलनकार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन  व सरांच्या मातोश्रीच्या प्रतिमा पुजनाने झाली. कार्यक्रमाचे सुत्रसं मोहनराव गायकवाड सर यांनी केले तर आभारप्रदर्शन भगवान वानखेडे यांनी केले. 

यानंतर सा.झंझावात च्या  वतीने प्रसिध्द केलेल्या प्रदिप पांढरे सर यांच्या जीवनावरील विशेषांकाचे प्रकाशन सर्व मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.  यावेळी एलिझाबेथ एकादशी या चित्रपटातील पंढरपूरचा बालकलाकार पुष्कर लोणकर याने आपली कला सादर केली. त्याचे कोडकौतुक डॉ.द.ता.भोसले यांचे हस्ते सत्काराने झाले. यानंतर डॉ.द.ता. भोसले व इतर मान्यवरांच्या हस्ते प्रदिप पांढरे सर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी म.स.पा. सचिव कल्याणराव शिंदे सर, पं.ता.माध्य. शिक्षक पतसंस्थेचे संस्थापक कमले (सर), प्रा.धनाजी चव्हाण, विद्यामंदिर हायस्कुल गार्डी  चे अध्यक्ष दत्तात्रय गायकवाड, सचिव घोरपडे, मुख्याध्यापक सपाटे सर कारंडे सर  व सर्व
शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद तसेच मंदार केसकर, अ‍ॅड. संदीप रणनवरे, लक्ष्मण मिसाळ (सर), मुलाणी सर, युवराज काळे सर, धावरकर सर, पत्रकार गौतम जाधव, पंढरपूर लाईव्ह चे संपादक भगवान वानखेडे, पत्रकार दिनेश खंडेलवाल, राधेश बादले, जैनुद्दीन मुलाणी, महेश कदम, प्रसाद बिडकर, प्रकाश इंगोले सर, प्राचार्य गायकवाड सर (भाळवणी),  रवि सोनार, प्राचार्य बागल सर, राजेंद्र भोसले, ज्ञानेश्‍वर देवकर (गुरुजी), प्रा.भालेराव, प्रा.वलेकर, तानाजी घाडगे, विनोद जाधव, बाजारे गुरुजी व एकनाथ ननवरे आदी मान्यवर उपस्थित होते.

**************

  

  

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

































































































































































































































































































































































































































































































































मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

































ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com









































 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.27 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   77 हजार 979 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 128 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.