पांडुरंगासमोर 6 वर्षीय मुलीस सर्पदंश...

  • पंढरपूर लाईव्ह:-

    पांडुरंगासमोर 6 वर्षीय मुलीस सर्पदंश...

  • पंढरीत विठ्ठलाच्या गाभार्‍यातील प्रकार...

  • मंदिरात प्रथमोपचाराची कोणतीही सुविधा नाही...

  • मंिेदर सुरक्षेच्या कारणास्तव रिक्षा मिळण्यास विलंब...

  • उपजिल्हा रुग्णालयात घेतले उपचार...

  • विठ्ठलकृपेने मुलगी वाचली...

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी):  पंढरपूरच्या विठ्ठल च्या गाभार्‍यात 6 वर्षाच्या मुलीला सर्प दंश झाल्याची खळबळजनक घटना आज दि. 26 मार्च 2015 रोजी दुपारी घडली.  बिहारमधून आलेल्या एला भविकाचे  कुटुंब काल मंदिरातील गाभार्‍याच्या दर्शन रांगेत उभं होतं. त्यावेळी या कुटुंबातील 6 वर्षाच्या मुलीस साप चावला. कुटुंबियांनी तिला तात्काळ पंढरपूरच्या  सरकारी रुग्णालयात दाखल केले असून या प्रकारात विठ्ठलाच्या कृपेने मुलीचे प्राण मात्र वाचले आहेत.

 बिहारच्या सिवान येथील रमेशकुमार सिंह हे चाकूर येथील बीएसएफ केंद्रात सेवेत आहेत. विठुरायाच्या दर्शनासाठी काल दुपारी ते पत्नी आणि 6 वर्षाची मुलगी नयनसी कुमारीसोबत विठ्ठल मंदिरात आले. दर्शन रांगेतून विठ्ठलाच्या गाभार्‍याजवळ आल्यावर दर्शन घेताना अचानक मुलगी साप चावला. यावेळी प्रकर्षाने समोर आलेली बाब म्हणजे मंदिरात कोणतीच प्रथमोपचाराची सोय नसल्यामुळे ़त्यांना दवाखान्यात जाण्यास सांगण्यात आले. मंदिराजवळ सुरक्षेच्या कारणामुळे वाहने आणणे बंद केल्याने त्यांना लवकर रिक्षाही मिळू शकली नाही. मात्र काही वेळाने उपजिल्हा रुग्णालयात दाखल होताच तातडीने उपचार सुरु करण्यात आले आणि विठ्ठलाच्या कृपेनी या चिमुरडीला जीवदान मिळाले.

 दरम्यान, मंदिराची नियमित साफसफाई करताना आतातरी साप, नाग आणि विंचवासारखे विषारी प्राणी नाहीत याची खबरदारी घ्यावी लागणार असून ज्या मंदिरात वर्षभर दीड कोटी पेक्षा जास्त भाविक येतात त्यांना आणीबाणीच्या प्रसंगी उपचार करायला प्रथमोपचार व्यवस्थाही नाही. त्यामुळे भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  यापुढे तरी मंदिरामध्ये अशा कांही घटना घडल्यास प्रथमोपचाराची सुविधा उपलब्ध व्हावी अशी भाविकांची अपेक्षा आहे.
****************

  

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.26 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   77 हजार 463 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 078 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.