गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही.के. सुगंधे सरांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)

विश्‍वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान चे वतीने सत्कार

येथील विश्‍वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान च्या वतीने गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. के. सुगंधे (सर) यांचा सेवानिवृत्तीमित्त सत्कार करण्यात आला. प्रतिष्ठान चे अध्यक्ष डी. राज सर्वगोड यांनी यावेळी सुगंधे सरांच्या शिक्षण क्षेत्रातील बहुमुल्य कार्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी अनिल ननवरे, विलास जगधने सर, दिपक नाईकनवरे, माने सर, दोडके सर, सुहास जाधव, राहुल ढवळे, सतीश माने व सर्व शिक्षक उपस्थित होते.

जोशाबा टाईम्स् चे वतीने सत्कार

येथील साप्ताहिक जोशाबा टाईम्स् च्या वतीनेही गौतम विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. के. सुगंधे (सर) यांचा सेवानिवृत्तीमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी जोशाबा चे संपादक श्रीकांत कसबे म्हणाले की, सन 2010 मध्ये नांदेडवरुन आलेल्या सुगंधे सरांनी शालेचे तत्कालीन मुख्याध्यापक सुभाष ढवळे सरांच्या सेवानिवृत्तीनंतर या शाळेची मुख्याध्याप पदाची सुत्रे आपल्या हाती घेतली. इंग्रजी विषयाचे सखोल शिक्षण येथील विद्यार्थ्यांना देत असतानाच आपल्या मुख्याध्यापक पदाच्या कार्यकालात सुगंधे सरांनी गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांचा व संस्थेचा चौफेर विकास साधण्यासाठी अविरत श्रम व निष्ठापुर्वक प्रयत्न केले. शाळेचे नांदेडवरुनच आलेले नुतन मुख्याध्यापक यरनारकर सर यांनी मुख्याध्यापक पदाची सुत्रे हाती घेतलेली असून त्यांचे स्वागतही जोशाबा टाईम्स् च्या वतीने करण्यात आले. यावेळी संपादक श्रीकांत कसबे, उपसंपादक विलास जगधने सर आदी उपस्थित होते.

गौतम विद्यालयाचे वतीने सुगंधे सरांचा सत्कार

गौतम विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांच्या वतीनेही विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. के. सुगंधे (सर) यांचा सेवानिवृत्तीमित्त सत्कार करण्यात आला. यावेळी अनेक शिक्षकांनी सुगंधे सरांविषयीच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला.

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 31 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   78 हजार 839 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 249 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.