रा.प. महामंडळाचे माजी अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक यांनी घेतले सिंघण गणपती (नागालॅन्डचा राजा) चे दर्शन

पंढरपूर लाईव्ह (प्रतिनिधी)

 
श्रीपांडुरंग सहकारी साखर कारखाना श्रीपूर चे नुतन चेअरमन व राज्य परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी दि. 28 मार्च 2015 रोजी ‘पांडुरंग’ च्या चेअरमनपदाची सुत्रे हाती घेतल्यावरोबर पंढरपूर मधील लिंक रोड लगत असलेच्या ‘सिंघण गणपती’ चे दर्शन घेणे पसंद केले. यासाठी ते सायंकाळी ठिक 7:30 वाजता सदर मंदिरात दाखल झाले. श्री ची पुजा करुन दर्शन व आशिर्वाद घेतले. यावेळी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांच्या नि:स्सीम गणेश भक्तीचे उत्कट दर्शन उपस्थितांना घडले. याच मंदिरात  त्यांचे स्वहस्ते स्थापन केलेल्या श्रीविठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन ही यावेळी त्यांनी घेतले.

यावेळी श्रीगणेश भक्त मित्र मंडळ पंढरपूर व जेष्ठ नागरिक संघ सिंघण नगर पंढरपूर यांचे वतीने; मंदिराचे संस्थापक-गणेशभक्त प्रा.नागेश सिंघण (सर) यांचे हस्ते ‘पांडुरंग’ च्या नुतन चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे स्वागत-अभिनंदन करुन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवर व जेष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्यांसोबत कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांनी मनमोकळ्या गप्पा मारल्या. कै.औदुंबर आण्णांच्या काळातील राजकारण ते आजच्या काळातील बदलते ‘राजकारणातील वारे’ याबाबत ते भरभरुन बोलले.

यावेळी अप्पासाहेब वांगीकर, शंकरआण्णा ऐतवाडकर सर, सर्वश्री.तोडकर, मेणकुदळे, साळुंखे पाटील, नळ, अरुणराव कोर्टीकर, कुंभार, मेजरनारायण सिंघन, आनंद भोसले, केशव भोसले व खादी भांडारचे सदस्य गणेश सिंघण व उपनगरातील अनेक नागरिकांसह आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते. यावेळी चि. रुद्रप्रतापसिंह गणेश सिंघण (कृष्णा) ला कर्मयोगी सुधाकरपंतांनी आशिर्वाद दिले.

सिंघण गणपती (नागालॅन्डचा राजा)

पंढरपूर शहरातील लिंकरोड लगतच्या उपनगरातील नागरिकांचे आराध्य जागृत देवस्थान म्हणून सिंघण गणपती (नागालॅन्डचा राजा) हे गणेश मंदिर सुपरिचित आहे. या भागातील सर्वप्रथम आणि जागृत असलेल्या या मंदिराची निर्मिती गणेश भक्त श्री.नागेश सिंघण सर यांनी केलेली असून येथील श्री ची प्राणप्रतिष्ठापणा गणेशभक्त माजी आमदार कै.तात्यासाहेब डिंगरे यांचे हस्ते संपन्न झालेली आहे. याच मंदिर परिसरात  कांही  वर्षापूर्वी कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक यांचे शुभहस्ते श्रीविठ्ठल रुक्मिणीच्या सुबक मुर्तींची प्राणप्रतिष्ठापणा करण्यात आलेली आहे. मंदिरात नेहमीच भाविकांची वर्दळ असते. मंदिरातील सर्व नित्योपचार गणेशभक्त श्री.नागेश सिंघण सर मोठ्या भक्तीभावाने करत असतात. गणेश चतुर्थि च्या दिवशी मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम घेतले जातात.

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com

 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि. 31 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   78 हजार 839 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 249 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.