प्रदुषण रोखण्यासाठी शौचालय बांधणे आवश्यक स्वच्छतेबाबत जनजागृती करावी-विभागीय आयुक्त-एस.चोक्कलिंगम


पंढरपूर लाईव्ह:-

पंढरपूर दि.20: पंढरपूर महत्वाचे तिर्थक्षेत्र असल्याने यात्रा कालावधीत विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रा कालावधीत प्रदुषण होऊ नये म्हणून उच्च न्यालयाच्या आदेशान्वये प्रदुषण रोखण्यासाठी कायमस्वरुपी व तात्पुरत्या स्वरुपाची शौचालय बांधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शौचालय

 

वापराबाबबत दिंडींतल्या पहिल्या मुक्कामा पासून स्वच्छतेबाबत जनजागृती करावी असे आवाहन विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी केले आहे. शासकीय विश्रामगृह पंढरपुर येथे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी मंदीर समितीचे अध्यक्ष आण्णा डांगे, नगराध्यक्षा साधना भोसले, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी, जिल्हा पोलिस प्रमुख दत्तात्रय मंडलिक, प्रांतधिकारी संजय तेली, तहसिलदार गजानन गुरव, न.पा.चे मुख्यधिकारी शंकर गोरे, गटविकास अधिकारी ज्ञानप्रकाश घुगे आदी उपस्थित होते

यावेळी पुढे बोलताना विभागीय आयुक्त एस.चोक्कलिंगम म्हणाले की, 'निरी' संस्थेच्या अध्यक्षतेखाली शौचालय बांधण्यासाठी कमिटी नेमण्यात येणार आहे. तसेच विठ्ठल-रुक्मिणी समिती मार्फत मठामध्ये शौचालय बांधण्यासाठी कार्यवाही सुरु असुन, आतापर्यंत 500 शौचालय बांधणीसाठी अर्ज आले आहेत. उर्वरीत मठांनी मंदीर समिती मार्फत शौचालय बांधून घ्यावेत. ज्या मठांनी धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केली
नाही अशा मठांनी तात्काळ नोंदणी करुन घ्यावी तसेच आवश्यक शौचालय बांधून घ्यावीत असे आवाहनही यावेळी आयुक्त यांनी केले. उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये न. पा. ची मालकी असलेल्या 65 एकर जागेत
राहुट्या व तंबू टाकण्याची व्यवस्था करण्यात आली असुन, त्यासाठी प्रशासनामार्फत सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुण देण्यात येणार आहेत. यात्रा कालावधीत स्थानिक हॉस्पीटल व दवाखाने चालू ठेवण्यात यावेत.तसेच भाविकांना तात्काळ औषधोपचार करण्यासाठी पोलिस विभागाकडून डॉक्टरांना विशेष पासची सुविधा करण्यात येणार असल्याचेही आयुक्त एस.चोक्कलिंगम यांनी सांगितले.

या बैठकी प्रसंगी दींडी प्रमुखांनी स्वच्छतेविषयी आपल्या सुचना मांडल्या. यावेळी मंदीर समितीचे सदस्य जयंत भंडारे, वसंत पाटील, दीडीं प्रमुख, विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

  

****************

 

आपल्या बातम्या लेख/साहित्य - माहिती व जाहिराती प्रसिध्दीस द्यावयाची असल्यास अवश्य संपर्क साधावा...

































































































































































































































































































































































































































































































































मोबा. नं.  8552823399  /  8308838111   

































ई-मेल:-  jhanjavat@gmail.com  livepandharpur@gmail.com









































 आपणास कळविण्यास आनंद वाटतो की, ‘पंढरपूर लाईव्ह’ या अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप चे जगाच्या कानाकोपर्‍यात असणार्‍या तमाम मराठी नेटीझन्सकडून उत्स्फुर्तपणे स्वागत होत आहे.      दि.26 मार्च  2015 रोजी ‘पंढरपूर लाईव्ह’ च्या ई-न्यूज वेब पोर्टल ची वाचक संख्या   77 हजार 433 च्या घरात पोहचलेली आहे. तर अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप आपल्या मोबाईलमध्ये घेणार्‍या मोबाईलधारकांची संख्या 7 हजार 074 च्या घरात गेलेली आहे. दिवसेंदिवस ‘पंढरपूर लाईव्ह’ ची लोकप्रियता वाढत असून यामुळे लाईव्ह च्या टीमची जबाबदारीही तेवढीच वाढलेली आहे. अधिकात अधिक दररोजचे अपडेट या न्यूज पोर्टलवर देण्याचा आमचा प्रयत्न आहे.