लोकमंगल बँक पंढरपूर शाखेच्या वतीने तिळगुळ कार्यक्रम संपन्न

पंढरपूर LIVE 18 जानेवारी 2019



लोकमंगल को-ऑप.बँक लि. सोालापूर, शाखा पंढरपूरच्या व पंढरपूर पत्रकार बांधवांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपूर पत्रकार भवनमध्ये तिळगुळ वाटप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार सिध्दार्थ ढवळे (सर) हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून अ‍ॅड.भगवानराव मुळे हे उपस्थित होते. 


प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शहा बुक स्टॉलचे संचालक उद्योजक संजय शांतीलाल शहा यांचा विशेष सामाजिक कार्यातील योगदानाबद्दल सत्कार करण्यात आला. तर ‘सेपक प्करॉ’ या क्रीडा प्रकारात महाराष्ट्र संघातून दुसर्‍या क्रमांकावर निवड झाल्याबद्दल कु.अमृता महादेव जाधव, रा.सिध्देवाडी या विद्यार्थिनीचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष भगवान वानखेडे, पत्रकार सुरक्षा समितीचे अध्यक्ष रामचंद्र सरवदे, श्रमीक पत्रकार संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, पंढरपूर पत्रकार संघाचे अध्यक्ष नितीन शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. 



कार्यक्रमात बोलताना प्रमुख पाहुणे श्री. शहा यांनी लोकमंगलच्या लोककल्याणकारी कामाचे कौतुक केले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.ढवळे यांनी लोकमंगलची प्रेरणा सर्वच स्तरावर पसरत रहावी. प्रमुख पाहुणे शहा यांच्या सामाजिक कार्याचं अनुकरण सर्वांनी करावे असे गौरोद्गार काढले.

शाखाधिकारी नंदकुमार भोसले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन केले. यावेळी अनेक पत्रकार बांधव उपस्थित होते. संचालक कसगावडे, भिलारे, कोळसे, शाम सावजी, वसेकर, जाधव यांच्या हस्ते सर्वांना तिळगुळ वाटप करण्यात आले. उपस्थितांचे आभार संचालक मडळांनी मानले. 





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com