कृष्णा देशमुख यांना गणित अध्यापक मंडळाचा आदर्श शिक्षक पुरस्कार

पंढरपूर LIVE 19 जानेवारी 2019


खर्डी अमोल कुलकर्णी
सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळाचे तालुकास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर येथील जिल्हास्तरीय कार्यशाळेत पार पडला .त्यावेळीं सांगोला तालुका गणित अध्यापक वतीने कृष्णा देशमुख यांना आदर्श शिक्षक पुरस्कार माजी आमदार सुधाकर परिचारक यांच्या हस्ते मिळाला.देशमुख यांनी 25 वर्ष गणित व विज्ञान या विषयाचे विविध उपक्रम राबवत असताना शाळेतील मुलांचे विज्ञान उपकरणाची राज्यस्तरीय निवड झाली आहे.तसेच गणितं या विषयाचे विविध स्पर्धा व उपक्रमात मुलांची निवड झाली आहे.


विकास विद्यालय अजनाळे ता सांगोला येथे त्यांनी आपल्या कार्याला सुरुवात केली.गणित व विज्ञान विषयावर त्यांनी अनेक वेळा तज्ञ मार्गदर्शक म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते हनुमान विद्यालय सुपली येथे कार्यरत आहेत.यावेळी आमदार भारत भालके जि. प.सदस्य सुभाष माने,आदी सह संपूर्ण जिल्ह्यातून आलेले गणित शिक्षक उपस्थित होते. त्यांच्या निवडीने सर्व शिक्षक ,विदयार्थी ,अजनाळे, सुपली येथील ग्रामस्थ यांनी शुभेच्छा दिल्या.
 





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com