आधुनिक शिक्षणाला मूल्याची जोड देणे आवश्यक - आमदार भारतनाना भालके
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2019
पंढरपूर: दि. “ कमवा व शिका योजना रयतेचा केंद्रबिंदू आहे. स्वावलंबी शिक्षणातून विद्यार्थी घडविण्याचे कार्य संस्था करीत आहे. श्रमप्रतिष्ठा मूल्याची जोपासना राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून केली जाते. शिक्षणाला श्रमाची जोड देण्याचे काम हे महाविद्यालय करीत आहे. आज देशामध्ये वृद्धाश्रमाचे प्रमाण वाढले आहे, ते कमी करण्याची जबाबदारी आजच्या तरुणांची आहे. आधुनिक शिक्षणाला मूल्याची जोड देणे आवश्यक आहे. ” असे विचार आमदार भारतनाना भालके यांनी व्यक्त केले. ते पंढरपूर येथील रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या मौजे मेंढापूर येथील शिबिराच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय मनोगतात बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड म्हणाले की, ‘दर्जेदार शिक्षणासाठी पायाभूत सुविधा आवश्यक आहेत. विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करून
जीवनात यश मिळवावे. आपल्या जीवनात सकारात्मक दृष्टीकोन फार महत्वाचा असतो.’ संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व माजी आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी मनोगतात, ‘कर्मवीर अण्णाच्यामुळे श्रमाला प्रतिष्ठा
मिळाली. ज्ञानाची गंगा घरोघरी पोहचविण्याचे काम संस्था करीत आहे. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे.’ असे विचार व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. अशोक भोईटे, गट विकास
अधिकारी रविकिरण घोडके, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, जिल्हा
परिषद सदस्य अतुल खरात, सरपंच सौ. जाई दिलीप कोरके, बबन
पाटोळे, सुधीर पवार, डॉ. एस. पी. शिंदे, सौ. डॉ एफ. एस. बीजापुरे,
डॉ. चंद्रकांत काळे आदी मान्यवर उपस्थित होते. वनराई बंधारा, वृक्ष
लागवड व संवर्धन, स्वच्छता, शोष खड्डे, हळदी-कुंकू समारंभ, आरोग्य
शिबीर, ग्रामसर्वे, एड्स प्रबोधन रॅली, व्यसनमुक्ती रॅली, योग, आणि
विविध विषयावर प्रबोधन व्याख्याने हे उपक्रम राबविण्यात आले. सर्व
सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. प्रास्ताविक व स्वागत डॉ. एस. पी. शिंदे
यांनी तर सूत्रसंचालन कु. अलका घोडके यांनी केले. आभार साहेबराव
पवार यांनी मानले. याप्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य व एन. एस. एस.
स्वयंसेवक-स्वयंसेविका बहुसंख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com




