रस्ते देखभाल दुरूस्ती योजने अंतर्गत मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यातील रस्त्यांसाठी रू.17 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर -आमदार भारत भालके
पंढरपूर LIVE 28 जानेवारी 2019
पंढरपूर दि.29 ः सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सन 2018-19 मधील रस्ते देखभाल दुरुस्ती योजनेअंतर्गत तरतुदी मधून मंगळवेढा व पंढरपूर तालुक्यांमधील मंगळवेढा ते बोराळे, अनवली ते मुंडेवाडी, खर्डी -तावशी-एकलासपूर व गोपाळपुर ते ओझेवाडी या रस्त्यांसाठी रू.17 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर झाल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी दिली. मंगळवेढा आणि पंढरपूर तालुक्यातील संबंधित गावातील रस्ते अत्यंत खराब अवस्थेत असल्याने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे या रस्त्याच्या दुरुस्तीबाबत आमदार श्री भारत भालके यांनी भेट घेऊन निधीची मागणी केली होती.
या सर्व रस्त्यांच्या कामासाठी 2 अर्थसंकल्पीय अधिवेशनात तरतूद व्हावी म्हणून आमदार श्री भारत भालके यांनी सातत्याने पाठपुरावा केलेला होता. यावर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या सर्व कामास मंजुरी मिळाली असून, यामुळे मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ते मंगळवेढा, पंढरपूर तालुक्यातील अनवली ते मुंडेवाडी, खर्डी, शेटफळ, तनाळी, तावशी, एकलासपूर, गोपाळपुर, ओझेवाडी हा खडतर प्रवास आता सुखकर होणार असून यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त होत आहे.
विशेषतः बोराळे अरळी सिद्धापूर तांडोर भागातील नागरिकांना याच मार्गाने मंगळवेढ्याकडे यावे लागत असल्याने अनेक वर्षापासून हा मार्ग अतिशय खराब अवस्थेत होता यामुळे विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिकांना प्रवास करत असताना अतिशय त्रास सहन करावा लागत होता. मात्र या रस्त्याच्या डांबरीकरणामुळे आता प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील या अनेक वर्षापासून नादुरुस्त असलेल्या रस्त्याच्या कामाबाबत गेल्या दोन वर्षात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना.श्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून आमदार श्री भारत भालके यांनी रू.17 कोटी 50 लाखांचा निधी मंजूर करत मंगळवेढा तालुक्यातील मंगळवेढा, अरळी, सिध्दापूर, तांडोर, बोराळे व पंढरपूर तालुक्यातील अनवली, मुंडेवाडी, अजनसोंड, खर्डी, तावशी, शेटफळ, एकलासपूर, गोपाळपूर, ओझेवाडी या भागातील प्रवाशांना नवीन वर्षाची भेट दिल्याने ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त होत आहे.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com