राजधानीत ‘महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सव’; गीत रामायणाने महोत्सवाची सुरुवात

पंढरपूर LIVE 18 जानेवारी 2019


नवी दिल्ली18 : प्रसिध्द गायक व संगीतकार सुधीर फडकेगीतकार ग. दि. माडगूळकर व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तीमत्व पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यावतीने आजपासून महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सवाससुरुवात होत आहे. गीत रामायणाने या महोत्सवाचा प्रारंभ होत आहे.
            


महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात अढळ स्थान निर्माण करणारे सुधीर फडकेग.दि.माडगूळकर आणि पु.ल.देशपांडे यांचे 2019 हे जन्मशताब्दीवर्ष  महाराष्ट्रासह देश-विदेशात साजरे होत आहे. याचेच औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि दिल्ली मराठी प्रतिष्ठान यांच्यावतीने येथील जनपथ रोड स्थित डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे  18  ते 20 जानेवारी 2019 दरम्यान महाराष्ट्र त्रिरत्न महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे.
गीत रामायणनाटक व चित्रपटाची खास मेजवानी
            या महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी रंगनिषाद प्रस्तुत गीत रामायणकार्यक्रमाचे सादरीकरण होणार आहे. गीत रामायण’ ही ग.दि.माडगूळकर आणि सुधीर फडके यांची कलाकृती आजही मराठी मनावर अधिराज्य गाजवित आहे. सुधीर फडके यांचे पूत्र प्रसिध्द गायक व संगीतकार श्रीधर फडके स्वत: गीत रामायण सादर करणार आहेत.
            

महोत्सवाच्या दुस-या दिवशी आचार्य अत्रे आणि पु.ल.देशपांडे यांच्या निवडक कलाकृतींवर आधारित आम्ही  आणि आमचे बाप’ या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. आदि कल्चरटेनमेंट आणि अष्टविनायक निर्मित या नाटकात अतुल परचुरेअजित परबपुष्कर श्रोत्री आणि आनंद इंगळे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
           

 महोत्सावाचा समारोप नुकताच प्रसिध्द झालेल्या भाई : व्यक्ती की वल्ली’ या पु.ल.देशपांडे यांच्या जीवनावरील चित्रपटाने होणार आहे. 20 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता हा चित्रपट दाखविण्यात येणार आहे. पहिल्या दोन्ही दिवासांचे कार्यक्रम सायंकाळी 6 वाजता सुरु होणार आहेत. हा महोत्सव सर्वांसाठी नि:शुल्क खुला आहे.



महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com