मोफत कॅन्सर निदान शिबीर; महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे शिबीर

पंढरपूर LIVE 16 जानेवारी 2019


प्रतिनिधी / पंढरपूर : 
   महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाच्या ( सर्व्हायकल ) कॅन्सरचे निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सोलापूर येथील श्री सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलची टीम तर्फे प्रत्येक महिलेची " पॅप स्मिअर ",तपासणी केली जाणार आहे. येथील गायत्री हायटेक हॉस्पिटल येथे शुक्रवार दि १८ जानेवारी रोजी या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती डॉ.सुरेंद्र काणे यांनी दिली आहे. हे शिबीर इनरव्हील क्लब,रोटरी क्लब,पंढरपूर ,डॉ.काणे मेडिकल असोसिएशन आणि भारत विकास परिषदेने हे शिबीर आयोजित केले आहे. 
     सध्या कॅन्सरचे प्रमाणात वाढ होत आहे. एका वैद्यकीय सर्वेक्षणानुसार एड्स पेक्षा जास्त कॅन्सरने रुग्ण मयत होण्याच्या प्रमाणत वाढ झाली आहे. या कॅन्सर मध्ये महिलांच्या गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सरचे निदान आणि योग्य उपचार केलयास तो बारा होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर दो काणे मेडिकल असोसिएशन तर्फे गेलया १० वर्षापासून या निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी त्यांच्या सोबत पंढरपूर येथील इनरव्हील,रोटरी क्लब आणि भारत विकास परिषद यांच्या मार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 
      या शिबिरात २५ वर्षा वरील महिलांसाठी संपुर्णपणे मोफत तपासणी केली जाणार आहे. प्रत्यक्ष कॅन्सर होण्यापूर्वीच्या अवस्थेत ( प्री कॅन्सर स्टेज ) निदान झाल्यास आणि योग्य उपचाराने हा कॅन्सर बरा होऊ शकतो. अशा प्रकारच्या कॅन्सरची खासगी दावाख्न्यात तपासणी हि खर्चिक आहे. या पार्श्वभूमीवर सोलापुरातील सुप्रसिद्ध कॅन्सर तज्ञांची उपस्थित राहणार आहेत.याचे निदान करणे सोपे आहे .तर यासाठी कोणतीही भूल अथवा सर्जरीची आवश्यकता नाही अशी माही डॉ काणे यांनी दिली. तरी सर्व माता भगिनी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या जवळील गायत्री हायटेक हॉस्पिटल येथे शुक्रवार दि १८ जानेवारी २०१९ रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजे पर्यंत या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. 







महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com