पंढरपूर शहरातील प्रबोधनकार ठाकरे चौक ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय या रस्त्यावर केलेल्या खोदकामाबाबत खुलासा करावा!- आमदार भारत भालके

पंढरपूर LIVE 16 जानेवारी 2019


पंढरपूर दि.16 ः पंढरपूर शहरातील प्रबोधनकार ठाकरे चौक(नवीन कराडनाका) ते उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हा रस्ता अतिशय रहदारीचा असून या रस्त्यावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, तहसिल कार्यालय, सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय कार्यालय, तालुका पोलीस स्टेशन तसेच हॉस्पिटल, दवाखाने असल्यामुळे या रस्त्यावर खूपच गर्दी असते. या रस्त्यावर लक्ष्मी टाकळी, कोर्टी या गांवाकडून येणारी वाहनेही बर्‍याच प्रमाणात असतात. त्यातच हा रस्ता खोदून ठेवला असत्यामुळे या रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होऊन नागरिकांना नाहक त्रास होत आहे. 
सदर रस्त्याच्या कामाचे डिझाईन व वर्क ऑर्डर नसतांनाही हा रस्ता कोणी खोदला? तसेच डिझाईन व वर्क ऑर्डर नसल्यामुळे सदर रस्त्याचे खेादकाम करणार्‍यावर कोणती कार्यवाही करणार? याचा खुलासा मा.जिल्हाधिकारी, सोलापूर व सार्वजनिक बांधकाम विभागाने करावा अशी मागणी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री भारत भालके यांनी केली.  
            सदर रस्त्याचे काम त्वरीत पूर्ण करून नागरिकांची होणारी गैरसोय दूर करावी असे आवाहनही आमदार श्री भालके यांनी केले.







महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com