पंढरीत साकारली भव्य गौदिंडी... गोवंश संवर्धन संस्था व निळकंठेश्वर गौशाळेच्या संयुक्त विद्यमाने शोभायात्रेचे आयोजन

पंढरपूर LIVE 25 जानेवारी 2019



गौदिंडी महोत्सवाच्या औचित्याने आज पंढरीत भव्य गौदिंडी साकारली. भारतीय संस्कृतीत गौमातेचे असलेले अनन्यसाधारण असे महत्व ओळखून  लातूर येथील भारतीय गोवंश संवर्धन संस्था व निळकंठेश्वर गौशाळेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या  51 दिवसीय लातूर ते श्रीक्षेत्र पंढरपूर गौ दिंडी महोत्सवाच्या ह्या  गौ  दिंडीचे आज पंढरीत आगमन झाले. आज 25 जानेवारी 2019 रोजी पंढरपुरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. अशी माहिती या गौ  दिंडीचे मुख्य संयोजक सीए मयूर मंत्री यांनी दिली. 
         


गोपाळपूर येथून पंढरपूर शहरातील प्रमुख मार्गावरून ही दिंडी सकाळी तनपुरे महाराजांच्या मठात पोहोचली. या गौ  दिंडीचे स्वागत पंढरपूर नगर परिषदेच्या अध्यक्षा सौ. साधनाताई भोसले  यांनी केले. त्यानंतर दुपारी तनपुरे मठ  या ठिकाणी गौ आधारित सेंद्रीय विषमुक्त शेती व अन्न, पंचगव्य चिकित्सा , गौ आधारित उद्योग, गो विज्ञान गोमातेचे  महत्व आदी विषयांवर  चर्चा व मान्यवरांचें  मार्गदर्शन झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे माजी अध्यक्ष तथा पांडुरंग सह.साखर कारखान्याचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक हे होेते तर मार्गदर्शक म्हणून  संतोष आनंदजी शास्त्री (श्री धाम वृंदावन, मथुरा), ह.भ.प.  प्र दी  कुलकर्णी ,  नानासाहेब कदम, डॉ. दिलीप कुलकर्णी, भारत रानरुई यांची उपस्थिती होते. मान्यवरांनी उपस्थितांना गोमातेचे सर्वंकष महत्व विशद करून सांगतले.







सायंकाळी सहा वाजता याच ठिकाणी गो व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होतेे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ.भारत भालके हे राहणार आहेत.  या कार्यक्रमात विदर्भरत्न प. पू. रामायणचार्य संजयजी महाराज पाचपोर यांचे व्याख्यान होणार असून  टाटा कँसर हॉस्पिटलचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ.  नवनाथ दुधाळ हे पंचगव्य चिकित्सा व नाडी तपासणी तसेच सर्व प्रकारच्या आजारासाठी व कॅन्सर  होऊच नये याकरिता मौलिक  मार्गदर्शन करणार आहेत.

शनिवार, दि. 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून सकाळी 9 : 15 वाजता तनपुरे महाराज मठ  येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी सोलापूर जिल्हा दूध संघाचे चेअरमन तथा पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन आ. प्रशांत परिचारक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. यावेळी  काशिनाथ थिटे पाटील, लक्ष्मीनारायणजी भट्टड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  त्यानंतर सकाळी अकरा वाजता ही दिंडी तनपुरे मठातून प्रस्थान करणार  आहे. तनपुरे महाराज मठातून निघालेली ही दिंडी शिवाजी पुतळा ,  श्रीकृष्ण मंदि, गांधी मार्ग,  नाथ चौक,  भजनदास चौक ,  नवीन पूल, श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर मार्गे   ( इस्कॉन   ) पंढरपूर येथे  दिंडीचे आगमन होईल.  त्याठिकाणी गो दिंडीचे स्वागत प्रल्हाद दास (इस्कॉन पंढरपूर), श्री राधा गिरिधारी दास (इस्कॉन पंढरपूर) हे करणार आहेत.त्यानंतर  सायंकाळी  साडे  सहा ते  रात्री दहा  यावेळेत  बाजीराव पडसाली , विठ्ठल रुक्मिणी मंदिर , पंढरपूर येथे  पुण्याचे ख्यातनाम गायक कन्हैया आगीवाल यांची भजन संध्या  होणार आहे. यावेळी दादा वेदक (अखिल भारतीय सत्संग सहप्रमुख, विश्व हिंदू परिषद), भागवताचार्य वा. ना . उत्पात, हभप. मदन महाराज हरिदास यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

रविवार, दि. 27 जानेवारी 2019 रोजी सकाळी 8 ते 11 या वेळेत श्री श्री राधा पंढरीनाथ मंदिर, (इस्कॉन ) पंढरपूर येथील शिल प्रभुपाद घाट याठिकाणी गो-पुष्टी महायज्ञ होईल. हा विधी 
 वेद मुर्ती अतुल चंद्रकांत कुलकर्णी गुरुजी यांच्या हस्ते संपन्न होईल.  यावेळी प. पु. आचार्य लोकनाथ स्वामी महाराज, पदयात्रा मंत्री, इस्कॉन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या गो पुष्टी यज्ञाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला असल्याचे मयूर मंत्री यांनी सांगितले. 

या गो दिंडीच्या यशस्वीतेसाठी मुख्य संयोजक सीए मयूर मंत्री, हभप. निळकंठ महाराज डावकरे यांच्याबरोबरच  समन्वयक जुगल बाहेती, सुनील राठी, रवींद्र साळे, बाबासाहेब  बडवे ,उमेश  वाघोलीकर, हरीष ताठे यांसह  अनेक मान्यवर परिश्रम घेत आहेत. त्याचबरोबर या गो दिंडीला श्री केशव गोशाळा, श्री पांडुरंग गोशाळा, श्री बालयोगी गोशाळा, श्री श्री विठ्ठल रुक्मिणी गोशाळा, श्री राधा पंढरीनाथ गोशाळा, श्री गोरक्षण गोशाळा , श्री कापड व्यापारी संघ,, श्री माहेश्वरी सभा, पंढरपूर,श्री माहेश्वरी युवा संगठन, श्री माहेश्वरी महिला मंडळ, श्री राजस्थानी मंडळ, पंढरपूर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू सभा, पश्चिमद्वार व्यापारी संघटना,शिवप्रतिष्ठान पंढरपूर, लिंगायत प्रतिष्ठान , विठ्ठल रुक्मिणी वारकरी शिक्षण संस्था, वारकरी पाईक संघ, वीर बाजी प्रभू प्रतिष्ठान, सनातन संस्था, हिंदू जनजगृती संस्था, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, श्री शिवभक्त प्रतिष्ठान ,मुमुसु पाठशाळा, जोगदंड वारकरी शिक्षण संस्था, पेशवा युवा मंच, ब्राह्मण  संघटन ,कोळी महर्षी वाल्मिकी संघटन , शिवप्रेमी संगठन, इस्कॉन पंढरपूर व गोशाळा, गोप्रेमी या सर्वांचे सहकार्य लाभत असल्याचे मयूर मंत्री यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com