व्यवसाय मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना अचूक दिशा मिळते– चेअरमन सौ शोभा काळुंगे... मंगळवेढ्यात स्वेरीची ‘व्यवसाय मार्गदर्शन मेळावा’ संपन्न
पंढरपूर LIVE 25 जानेवारी 2019
पंढरपूर-(संतोष हलकुडे) ‘विद्यार्थ्यांनी करिअर करताना योग्य मार्गदर्शन घेतले तर जीवनात यशस्वी होतो. करिअर करताना संधी ही प्रत्येकांना समान मिळते परंतु त्या संधीचा वापर योग्य प्रकारे करून त्याचे सोने केले तर भविष्य उज्वल होईल. यासाठी योग्य मार्गदर्शनाची देखील गरज आहे. मार्गदर्शनाच्या माध्यमातून विध्यार्थ्यांना भविष्य घडविण्यासाठी स्वेरीने संधी दिली असून याचे विद्यार्थ्यांनी सोने केले पाहिजे.‘स्वेरी’ ही अभियांत्रिकीची शाळा आहे, त्यामुळे ती आपली वाटते.’असे प्रतिपादन धनश्री पतसंस्थेच्या चेअरमन सौ शोभा काळुंगे यांनी केले.

स्वेरी संचलित डिप्लोमा इंजिनिअरिंग वतीने मंगळवेढ्यामधील श्रीराम मंगल कार्यालयामध्ये ‘व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्या’त कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून सौ काळुंगे मार्गदर्शन करत होत्या. प्रा. यशपाल खेडकर म्हणाले की, ‘व्यवसाय मार्गदर्शन हे करिअरची दिशा ठरू शकते. आर्ट्स कॉमर्स, सायन्स या शिक्षण उत्तम आहेत परंतु बारावी नंतरच्या वाटा माहित असणे गरजेचे आहे. उत्तम व्यवसाय करण्यासाठी उत्तम मार्गदर्शन असणे आवश्यक आहे.’ असे सांगून जेईई, सीईटी परीक्षा, तंत्र शिक्षण घेण्यासाठी उपलब्ध शैक्षणिक कर्ज, वसतिगृहासाठी शासनाच्या सुविधा, कमवा आणि शिका योजना, कॅम्पस प्लेसमेंट आदी विषयी माहिती दिली. डॉ. अनुप विभूते म्हणाले की, अभियंत्यांनी जगाला आणखी जवळ आणण्याचे कार्य केले असून सध्याचे युग हे संगणकाचे युग असून विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आत्मसात केले पाहिजे. कारण भविष्यात अनेक कार्ये यंत्रमानव (रोबोट) करेल. अशी सुविधा होईल. यासाठी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात करीयर करताना निर्णय क्षमता वाढविणारे शिक्षण म्हणजे तंत्र शिक्षण घेणे गरजेचे आहे.’ असे सांगितले.
प्रमुख पाहुण्या म्हणून बोलताना नगरसेविका अॅड अनिता नागणे म्हणाल्या की, ‘आत्मविश्वास, चिकाटी, सातत्य आणि प्रयत्न असेल तर निश्चित यश मिळते. प्रयत्न करूनही अपयश मिळत असेल तर नाउमेद न होता अधिक प्रयत्न करा. त्याला मार्गदर्शनाची जोड द्या हमखास यश मिळेल.’ प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ म्हणाले की, ‘दहावीला ४५ टक्के गुण मिळविणारा विद्यार्थी स्वेरीच्या डिप्लोमामध्ये पंच्याऐंशी टक्के गुण संपादित करतो ही जादू नसून त्यासाठी त्या गुणवंत विद्यार्थ्याने घेतेलेले परिश्रम असतात. यासाठी विद्यार्थ्यांनी नेहमी ध्येय गाठण्यासाठी करत असलेल्या प्रयत्नात सातत्य ठेवा.’ असे सांगून स्वेरीच्या यशाची वाटचाल सांगितली. स्वप्नील गवळी हे विद्यार्थी मनोगत मांडताना म्हणाले की,’ अशा दिशा दर्शक मार्गदर्शनामुळे आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळते. तसेच विद्यार्थ्यांकडे जर आत्मविस्वास असेल तर काहीही अशक्य नाही.’ असे सांगितले. या मार्गदर्शन मेळाव्यात संगम विद्यालय, कचरेवाडी. जवाहरलाल विद्यालय मंगळवेढा, न्यू इंग्लिश स्कूल, बेगमपूर, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मंगळवेढा, शरण बसवेश्वर विद्यालय, नंदूर, गणेश विद्यालय गणेशवाडी, या शाळांमधील जवळपास ७०० विद्यार्थी, आय.टी.आय.चे प्राचार्य प्रा. रुपनर, प्रा. माने, प्रा. ताड, न्यू इंग्लिश स्कूलच्या सहशिक्षिका सौ. मंदाकिनी पाटील उपस्थित होते. मार्गदर्शन मेळावा यशस्वी होण्यासाठी मेळाव्याचे समन्वय प्रा. सुनिल गायकवाड, प्रा. शरद कावळे, प्रा. शाम भीमदे व प्रा. एम.आर. कांबळे, प्रा. एम.एम. मोरे यांच्यासह डिप्लोमाच्या प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. सुनिल भिंगारे यांनी केले तर प्रा. शिवाजी गायकवाड यांनी आभार मानले.

महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर LIVE
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
& Android Application
* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर LIVE
तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!
* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे
* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
Whatsup- 8308838111, 7083980165
Mobile- 7972287368
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com
- mail-livepandharpur@gmail.com
- web - http://www.pandharpurlive.com



