स्वेरी पॉलिटेक्निक कॉलेजमधील २५ विद्यार्थी १०० पैकी १०० पैकी गुण मिळवून राज्यात प्रथम

पंढरपूर LIVE 18 जानेवारी 2019


पंढरपूर- महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ,मुंबई यांनी घेतलेल्या हिवाळी २०१८ परीक्षेत पंढरपूर येथील स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) कॉलेजच्या एकूण ११५ विद्यार्थ्यांनी ९० टक्के पेक्षा जास्त गुण तर ८० टक्के ते ८९.९९ टक्के पर्यंत ४०५ विद्यार्थ्यांनी गुण प्राप्त करून नेत्रदिपक यश मिळवले.ह्या वर्षी १०० टक्के प्रवेश पूर्ण झालेले महाराष्ट्रातील एकमेव खाजगी कॉलेज असून उज्ज्वल निकालामुळे कॉलेजचा व संस्थेचा नावलौकिक महाराष्ट्रभर झाला आहे.
        

प्रथम वर्षातील गणित (एम.वन) या विषयात तब्बल १५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० पैकी गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.तर याच विषयात ९७ व त्यापेक्षा जास्त गुण ३७ विद्यार्थ्यांनी मिळवले. द्वितीय वर्षातील स्ट्रेंग्थ ऑफ मटेरीअल (सॉम )’ या विषयामध्ये समीर शरद कदम यांनी १०० पैकी १०० पैकी गुण मिळवून तर द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग या शाखेतील यश विवेक कटकमवार,प्रणोती सुखदेव कोष्टी,प्रीती पंडित रणपिसे या ३ विद्यार्थ्यांनी ‘ओओपी’ या विषयामध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला. याच शाखेतील विद्यार्थी ऋतुजा युवराज गायकवाड, स्नेहा किरण हिंगमिरे, यश विवेक कटकमवार,प्रणोती सुखदेव कोष्टी, महानंदा पुजारी, प्रीती पंडित रणपिसे अशा ६ विद्यार्थ्यांनी ‘डाटा स्ट्रक्चर युजींग-सी’ या विषयांमध्ये १०० पैकी १०० गुण प्राप्त करून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य डॉ.एन.डी.मिसाळ यांनी दिली.

 या वर्षी प्रथम वर्ष अभियांत्रिकी पदविका या वर्गाचा ऑल क्लियर निकाल ८३.९४ टक्के एवढा लागला.यामध्ये प्रथम क्रमांक गीतांजली महादेव चव्हाण-९७.५७ टक्के,द्वितीय क्र.संगीता नारायण पुजारी-९१.५३ टक्के, तृतीय क्र.आदेश बळीराम नाईकवाडी-९१.४१ टक्के गुण मिळवले. द्वितीय वर्षामध्ये संपूर्ण शाखेतून प्रथम क्र. अनुक्रमे यश विवेक कटकमवार व प्रणोती सुखदेव कोष्टी यांना प्रत्येकी ९६.८० टक्के , द्वितीय क्र. महानंदा पुजारी -९६.१३ टक्के, तृतीय क्र.ऋतुजा युवराज गायकवाड-९५.७३ टक्के यांनी पटकावला. तर तृतीय वर्षामध्ये संपूर्ण शाखेतून प्रथम क्र. धनेश जाधव-९४.५९ टक्के,द्वितीय क्र. अथर्व चंद्रकांत भोसले-९३.७८ टक्के,तृतीय क्र. सिद्धेश जगदीश खडके-९२.६३ टक्के यांनी पटकावला.यशस्वी विद्यार्थ्यांचे स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे, संस्थेचे अध्यक्ष प्रा. सी. बी. नाडगौडा, उपाध्यक्ष आर.बी. रिसवडकरइतर पदाधिकारी, विश्वस्त, डिप्लोमा इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, तसेच संस्थेंअंतर्गत असणाऱ्या बी. फार्मसीचे प्राचार्य डॉ. एस.डी. सोनवणे, डी. फार्मसीचे प्राचार्य प्रा. सतिश मांडवे, सर्व विभागप्रमुख,सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी अभिनंदन केले.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com