अखेर इसबावीतील अपघातांची मालिका थांबविण्यासाठी सरसावले आमदार भारतनाना भालके... समक्ष हजर राहून आवश्यक तेथे बसवून घेतले गतीरोधक..!!

पंढरपूर LIVE 18 जानेवारी 2019

पंढरपूर-पुणे मार्गावर इसबावी येथील मलपे ओढ्याजवळ व विसावा मंदिर नजीक अनेकदा अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अपघातामध्ये अनेक निष्पापांचे बळी गेले आहेत. "हा मार्ग भंडीशेगाव ते पंढरपूर एकेरी करावा व आवश्यक तेथे गतीरोधक बनवावेत. अशी नागरिकांची मागणी होती. याबाबत पंढरपूर लाईव्हनेही वारंवार वृत्तमालिका प्रसारित केली होती."
 अखेर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेचे आमदार भारतनाना भालके स्वत:च या मार्गावरील अपघातांची मालिका थांबवण्यासाठी सरसावले असून या मार्गावर स्वत: हजर राहून आवश्यक तेथे गतीरोधक बनवून घेण्याचे महत्वाचे काम त्यांनी केले आहे. आमदार भारतनाना भालके यांच्या जागृकतेचे सर्वत्र कौतुक होत आहे. या मार्गावर भंडीशेगाव ते पंढरपूर पर्यंत एकेरी वाहतुक सुरु करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न करावेत अशी अपेक्षा नागरिकांमधुन व्यक्त होत आहे.


 पंढरपूर शहरातील के.बी.पी.कॉलेज चौक ते इसबावी-वाखरी हा रस्ता अतिशय रहदारी असून हा रस्ता अपघाती रस्ता म्हणून ओळखला जातो. गेल्या 6 महिन्यापासून या रस्त्यावर अपघातामध्ये  5 निष्पाप लोकांना निष्कारण आपले जीव गमवावे लागले आहेत. दोन दिवसापूर्वी पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार भारत भालके यांनी सदर अपघाती रस्त्याबाबत लक्ष घालून येथील स्थानिक नागरिक व संबंधित अधिकार्‍यांना बरोबर घेऊन या अपघाती रस्त्यावर प्रत्यक्ष जाऊन रस्त्यावर योग्य त्या ठिकाणी तातडीने गतिरोधक करण्याचे सूचना दिल्या होत्या.

 
त्यानुसार आज दि.17.01.2019 रोजी सदर अपघाती रस्त्यावर गतिरोधक करण्याचे काम चालू झालेले दिसून येत आहे. त्यामुळे या    
रस्त्यावर आता अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झालेले आहे.





महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com