डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन व एक हजार विद्यार्थी क्षमतेच्या शासकीय वसतिगृहाचे उदघाटन संपन्न

पंढरपूर LIVE 18 जानेवारी 2019


विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे अग्रदूत बनावे 
-केंद्रिय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर
  
  पुणे- डॉ.बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृहाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार आहेविद्यार्थ्यांनी या संधीचा उपयोग करूनसमाजातील गरीब विद्यार्थ्यांना मोफत शिकवून उत्तम नागरिक घडवावेअसे प्रतिपादन केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले.
        

 
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे डॉबाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन तसेच एक हजार विद्यार्थी क्षमता असलेल्या शासकीय वस्तीगृह इमारतीचे उद्घाटन  केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते आज संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होतेयेरवडा परिसरातील विश्रांतवाडी येथील सर्वे नंबर 104/105येथे या वास्तू उभारण्यात आल्या  आहेतसामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले कार्यकर्त्यांच्या अध्यक्षस्थानी होतेजलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळेजगदीश मुळीकगौतम चाबुकस्वार,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,  सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारेसमाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर,बार्टीचे महासंघाचे कैलास कणसे,सामाजिक न्या विभागाचे प्रादेशिक उपायुक्त अविनाश देवसटवार हे उपस्थित होते.   
         

यावेळी मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांनी समाजातील सर्व घटकांना न्याय मिळेल यासाठी शासन  योजना राबवित आहे, असे सांगितले.शिक्षणासोबत विद्यार्थ्यांनी शरीर तंदुरुस्त ठेवावे असे आवाहन त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दुर रहावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
           सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनीविद्यार्थ्यांनी या वसतिगृहाचा लाभ घेऊन शिक्षण घ्यावे असे सांगितलेसामाजिक न्याय विभागाने ४३५ वसतिगृहे सुरू केली आहेतविद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना शासन राबवित आहेबार्टीच्या माध्यमातून दोनशे विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी परदेशी पाठविले आहे.वसतिगृहात वास्तव्य करणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाहीयाची सर्व संबंधितांनी दक्षता घेण्याची सूचना केली.
           

सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी,  वसतिगृहाच्या माध्यमातून शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या विद्यार्थ्यांची निवासाची सोय होणार असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करावेअसे सांगितले.
      आ.जगदिश मुळीक यांनीशासकीय वसतिगृहाचा सर्वात मोठा प्रकल्प आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन सामाजिक न्याय विभागाचे उपायुक्त अविनाश देवसटवार यांनी केलेयावेळी उपस्थित मान्यवरांचे भारतीय संविधानाची प्रत देऊन  स्वागत करण्यात आले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन व मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहाची वैशिष्टये
  बारा एकर परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर न्याय भवन व मागासवर्गीय मुलांचे वसतिगृहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात 500 विद्यार्थ्यांची सोय असलेले वसतिगृह बांधून पूर्णदुसऱ्या टप्प्यातील आणखी 500 विद्यार्थ्यांसाठीच्या वसतिगृहाचे काम अंतिम टप्प्यात.विद्यार्थ्यांना प्रवर्गनिहाय गुणवत्तेनुसार   प्रवेश दिला जाणार असूनराहण्याची व जेवण्याची व्यवसथाया वसतिगृहामध्ये 750 विद्यार्थी व 250 विद्यार्थींनींची सोय होणार.




महाराष्ट्रातील नंबर वन! ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर  LIVE 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
& Android Application

* सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर  LIVE

तब्बल 35 लाखांहून अधिक वाचकांच्या पसंतीस पात्र ठरलेल्या आपली, आपल्या व्यवसयाची जाहिरात द्या.. इफेक्ट बघा..!

* कार्यालय:- बॅडमिंटन हॉल समोर, संत रोहिदास चौक, 

पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


* मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

* उपसंपादक - विजयकुमार गायकवाड 

Whatsup- 8308838111, 7083980165 
Mobile- 7972287368

  • mail-livepandharpur@gmail.com
  • web - http://www.pandharpurlive.com